शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पूरनियंत्रण प्रकल्पासाठी सुकाणू समितीची स्थापना, ‘मित्र’ संस्थेतर्फे समन्वय समितीही होणार गठित

By समीर देशपांडे | Updated: July 31, 2024 12:55 IST

असा राहील प्रकल्प अंमलबजावणी कक्ष

समीर देशपांडेकोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा-भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या ३२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महसूल विभागाकडून राज्यस्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेने हे कर्ज मंजूर केले असून, शासनाच्याच ‘मित्र’ संस्थेवर या प्रकल्पावर संपूर्ण देखरेख आणि कामकाज व्यवस्थापनासाठी समन्वय समिती गठित करण्यात येणार आहे.सध्याच्या पूर स्थितीत असलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला या प्रकल्पाविषयी उत्सुकता आहे. पुराचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा हा प्रकल्प असून, २०१९ च्या पुरानंतर स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनीही आपल्या अहवालात अशा पद्धतीने अतिरिक्त पाणी अन्य खोऱ्यात वळविण्याची शिफारस केली होती. या अहवालाच्या आधारे एशियन बँक आणि जागतिक बँकेकडे या प्रकल्पासाठी कर्जरूपी निधीची मागणी करण्यात आली होती. जागतिक बँकेने यासाठी कर्ज मंजूर केले असून, तशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.या विशाल प्रकल्पाचा पुढचा टप्पा म्हणून ही सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीचे सह अध्यक्ष हे ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. अपर मुख्य सचिव वित्त, नियोजन, जलसंपदा, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन हे समितीचे सदस्य असून, आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक हे सदस्य सचिव राहणार आहेत.

असा राहील प्रकल्प अंमलबजावणी कक्षमहाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमानुसार या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्प, वित्तीय व्यवस्थापन, खरेदी, तांत्रिक आणि सहायक कर्मचारी अशा सहा विभागांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. चार पानांच्या या शासन आदेशात या संपूर्ण प्रकल्पाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

प्रकल्प आहे चर्चेतया ३२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे संपूर्ण महापुरावर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे मत ज्या समितीच्या शिफारशीमुळे या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार झाला त्या वडनेरे समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी नमूद केले आहे. परंतु, या अनुषंगाने अतिरिक्त पाणी काही प्रमाणात वळवून पाणी नसणाऱ्या भागाला त्याचा फायदा देता येईल हे त्यांनी मान्य केले आहे. परंतु, एकूणच या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबतही सध्या चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर