शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेतील दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा, जिल्हा प्रशासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 10:50 IST

CoronaVirus In Kolhapur : ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने स्तर ४ मधील जिल्ह्यांसाठी जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार उद्या, सोमवारपासून कोल्हापूरमधील अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र रोज सायंकाळी पाच वाजल्यापासून तसेच शनिवार व रविवारी नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी रात्री जाहीर केले.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेतील दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा, जिल्हा प्रशासनाचा आदेश सोमवारपासून अंमलबजावणी, शनिवारी, रविवारी कडक निर्बंध

कोल्हापूर : ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने स्तर ४ मधील जिल्ह्यांसाठी जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार उद्या, सोमवारपासून कोल्हापूरमधील अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र रोज सायंकाळी पाच वाजल्यापासून तसेच शनिवार व रविवारी नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी रात्री जाहीर केले.राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे सरसकट राज्याला एकाच प्रकारचे नियम लागू करण्याऐवजी राज्य शासनाने कोरोना पॉझिटिव्ह रेट व ऑक्सिजन बेडवरील रुग्णांच्या टक्केवारीनुसार जिल्ह्यांची पाच स्तरांवर विभागणी केली आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश स्तर ४ मध्ये होतो.

या विभागासाठीच्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांना चार वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. पूर्वी ही वेळ सकाळी ११ वाजेपर्यंत होती. रोज सायंकाळी पाचनंतर तसेच शनिवारी व रविवारी अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही. ही नियमावली उद्या, सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्यूटी पार्लर ५० टक्के क्षमतेसहव्यायामशाळा, केश कर्तनालये, ब्यूटी पार्लर, स्पा व वेलनेस सेंटर्स सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. येथे फक्त लसीकरण केलेल्या व्यक्तींनाच सेवा दिली जाईल. शनिवार, रविवारी दुकाने बंद राहतील.मॉर्निंग वॉक, खेळ, चित्रीकरणनागरिकांना मॉर्निंग वॉक, विविध खेळ, सायकलिंगसाठी सोमवार ते शुक्रवार पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेत सार्वजनिक ठिकाणे, उद्याने व मैदानांवर जाता येईल. अलगीकरणाची व्यवस्था असलेल्या व गर्दी होणार नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण करता येईल.हे सुरू राहील.

  • अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने चार वाजेपर्यंत
  • हॉटेलमधील पार्सल सेवा व घरपोच सेवा
  • अत्यावश्यक सेवेतील खासगी तसेच शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेसह
  • बसेस ५० टक्के क्षमतेसह
  •  कामगारांच्या राहण्याची सोय असलेले व निर्यातीचे उद्योग व बांधकाम
  •  बैठका, निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या सभा ५० टक्के क्षमतेसह
  • लग्नसमारंभ २५ जणांच्या उपस्थितीत, तर अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत.
  • कृषी व पूरक सेवा ४ वाजेपर्यंत.

हे बंद राहील

  •  अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने
  • चित्रपटगृहे, मॉल
  • धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय व करमणुकीचे कार्यक्रम.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर