‘ईएसआयसी’ची ‘स्पेशालिस्ट ओपीडी’ कोल्हापूर सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:52 AM2018-04-20T00:52:41+5:302018-04-20T00:52:41+5:30

कोल्हापूर : राज्य कर्मचारी बिमा निगमकडून (एम्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) कोल्हापुरात पहिल्या टप्प्यामध्ये स्पेशालिस्ट ओपीडी (विशेषज्ञ बाह्यरुग्ण विभाग) सुरू केला जाणार आहे.

'ESIC' Specialist OPD 'will be started in Kolhapur | ‘ईएसआयसी’ची ‘स्पेशालिस्ट ओपीडी’ कोल्हापूर सुरू होणार

‘ईएसआयसी’ची ‘स्पेशालिस्ट ओपीडी’ कोल्हापूर सुरू होणार

Next
ठळक मुद्देकामगारांना सुविधा : डॉक्टरांच्या मुलाखतीची प्रक्रिया, अंतर्गत रस्ते पूर्ण ; कामगारदिनी उद्घाटन

कोल्हापूर : राज्य कर्मचारी बिमा निगमकडून (एम्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) कोल्हापुरात पहिल्या टप्प्यामध्ये स्पेशालिस्ट ओपीडी (विशेषज्ञ बाह्यरुग्ण विभाग) सुरू केला जाणार आहे. येथे विविध विकारांवरील अकरा तज्ज्ञ डॉक्टर आणि सात निवासी डॉक्टर कार्यरत असतील. ही ओपीडी कामगार दिनी सुरू करण्यादृष्टीने ‘ईएसआयसी’कडून तयारी सुरू आहे.
कोल्हापूरमधील विमाधारकांना त्यांच्या हक्काची ‘आरोग्य सेवा एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासकीय विश्रामगृहामागील (ताराबाई पार्क) सुमारे आठ एकर जागेत दीडशे बेडची ‘ईएसआयसी’ रुग्णालयाची इमारत गेल्या २० वर्षांपूर्वी उभारण्यात आली. मात्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, निधी उपलब्धता आदी कारणांमुळे हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही. राज्य सर्व श्रमिक महासंघासह अन्य कामगार संघटनांचा लढा आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी सरकार, ईएसआयसीकडे केलेल्या पाठपुराव्यांमुळे हे रुग्णालय सुरू होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत ‘ईएसआयसी’तर्फे पहिल्या टप्प्यात स्पेशालिस्ट ओपीडी सुरू केली जाणार आहे. यासाठी औषधतज्ज्ञ, अस्थिरोग, शल्यचिकित्सक, नेत्रविकार, क्षयरोग व ऊरोरोग, त्वचारोग, बालरोग, स्त्रीरोगतज्ज्ञ अशा दहा डॉक्टरांसह सात निवासी डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी ९ आणि १० एप्रिलला मुलाखतीची प्रक्रिया पार पडली. कंत्राटी स्वरूपातील नेमणुका असणाऱ्या संबंधित डॉक्टरांना लवकरच नियुक्तीची पत्रे पाठविण्यात येतील. संबंधित ओपीडी कामगारदिनी सुरू करण्याच्यादृष्टीने ‘ईएसआयसी’कडून तयारी सुरू आहे. सध्या या रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्ते, ओपीडीच्या इमारतीमध्ये वीज, पंखे, साफसफाईचे काम पूर्ण झाले आहे. ओपीडीच्या इमारतीची रंगरंगोटी करण्यात येत आहे. या रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा लाभ कोल्हापुरातील सुमारे एक लाख कामगारांसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील विमाधारक कामगारांना घेता येईल.

अंधेरीतील मॉडेल हॉस्पिटलकडून मदत
अंधेरीमध्ये ईएसआयसीचे पाचशे बेडचे मॉडेल हॉस्पिटल कार्यान्वित आहे. तेथून आवश्यक ती मदत कोल्हापुरातील रुग्णालयासाठी घेतली जाणार आहे. इमारतीचे नूतनीकरण, डागडुजीच्या कामाची निविदा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकामची तयारी आहे.

ईएसआयसीतर्फे ाहिला टप्पा म्हणून ओपीडी सुरू केली जाईल. तिचा प्रारंभ कामगारदिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार राज्य विमा महामंडळ समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचे नियोजन आहे.
- धनंजय महाडिक, खासदार

Web Title: 'ESIC' Specialist OPD 'will be started in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.