शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उदगाव दरोड्यातील आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून, महिलेचा खून करून साडेसात लाख किमतीचा ऐवज लंपास करणाºया आरोपीने आजाराचा बहाणा करीत सीपीआर रुग्णालयातून रविवारी पहाटे चारच्या सुमारास हातातील बेड्या काढून पलायन केले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय २३, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून, महिलेचा खून करून साडेसात लाख किमतीचा ऐवज लंपास करणाºया आरोपीने आजाराचा बहाणा करीत सीपीआर रुग्णालयातून रविवारी पहाटे चारच्या सुमारास हातातील बेड्या काढून पलायन केले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय २३, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. आरोपीने पलायन केल्याचे समजताच जिल्हा पोलीस दलात खळबळ माजली. सर्वत्र नाकाबंदी करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु रात्रीपर्यंत तो सापडला नाही.उदगाव ते शिरोळ जाणाºया बायपास रस्त्यावर निकम मळा येथे शेतवडीत प्रा. प्रीतम बाबूराव निकम यांचा बंगला आहे. दि. १३ आॅगस्टला रात्री बंगल्यावर दरोडा पडला. यावेळी आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी प्रीतम यांच्या आईवडिलांवर खुनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अरुणा निकम (५५) यांचा मृत्यू झाला; तर बाबूराव निकम हे गंभीर जखमी झाले होते. प्रा. प्रीतम निकम यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी संशयित विशाल पवार याच्यासह आकाश नामदेव पवार ऊर्फ जाबाज उपकाºया पवार, मैनेश झाजम्या पवार, शेळक्या जुरब्या पवार या चौघांना अटक करून जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. सात दिवसांच्या कोठडीनंतर या चौघांची बिंदू चौक कारागृहात रवानगी झाली.चालता येत नसतानाही पलायनयातील अन्य साथीदार योगेश काळे, मन्या पवार, तळपापड्या काळ्या हे फरार आहेत. त्यांनी पवारला पळून जाण्यामध्ये मदत केल्याची शक्यता आहे. लक्ष्मीपुरी पोलीस सीपीआर रुग्णालय, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानकासह आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पवार याला सरळ चालता येत नाही, तो वाकून चालतो. तरीही त्याने पलायन केले.तिघांचे आज निलंबन शक्यबंदोबस्तास असणाºया पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे दरोड्यातील आरोपीने पलायन केले. याप्रकरणी सहायक फौजदार दिनकर कवाळे, कॉन्स्टेबल सचिन वायदंडे व होमगार्ड ए. एस. सूर्यवंशी या तिघांवर आज, सोमवारी निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. रविवारी सुटी असल्याने रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी आदेश निघाला नव्हता.नातेवाइकांच्या घरावर छापेदरोड्यातील आरोपींचे नातेवाईक कर्जत, श्रीगोंदा (अहमदनगर), करमाळा (सोलापूर), इंदापूर (पुणे) या भागांत सक्रिय आहेत. त्यामुळे पवार या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता ओळखून जयसिंगपूर पोलिसांनी येथील पोलीस ठाण्यांना सावध केले. येथील नातेवाइकांच्या घरासह तासगाव, वाळवा, मिरज, आदी ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून शोध घेतला.पलायन नाट्यानंतर पोलिसांना बसला धक्का!बिंदू चौक येथील कारागृहात असताना संशयित विशाल पवार याला मूळव्याधीचा त्रास होऊ लागल्याने दि. २८ सप्टेंबर रोजी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथील दूधगंगा इमारतीच्या तिसºया मजल्यावरील सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार दिनकर एस. कवाळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पी. वायदंडे, होमगार्ड ए. एस. सूर्यवंशी होते. वॉर्डमध्ये रुग्णसंख्या जास्त असल्याने शनिवारी (दि. ३०) रात्री संशयित पवार याला हाताची बेडी बेडला लावून झोपवून वायदंडे व सूर्यवंशी बाहेरील हॉलमध्ये झोपले. याच संधीचा फायदा घेत पवार याने पहाटे चारच्या सुमारास हातातील बेडी शिताफीने काढत पलायन केले. पहाटे सहाच्या सुमारास वायदंडे हे झोपेतून उठून वॉर्डात आले असता पवार बेडवर नव्हता. त्याने पलायन केल्याचे पाहून वायदंडेना धक्काच बसला. त्यांनी सहायक फौजदार कवाळे यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. तासाभरात कवाळे सीपीआर रुग्णालयात आले. या तिघांनी आजूबाजूला त्याचा शोध घेतला. शोध घेऊन थकल्यानंतर कवाळे यांनी नियंत्रण कक्षाला आरोपी पवारने पलायन केल्याची वर्दी दिली. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कराहून नाकाबंदीचे आदेश दिले. संपूर्ण शहरात नाकाबंदी केली; परंतु ठावठिकाणा लागला नाही.