शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

अटीतटीच्या दोन्ही लढती बरोबरीत : चारही संघांना प्रत्येकी एक गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:21 IST

कोल्हापूर : के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ व दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ यांच्यातील ...

ठळक मुद्दे के.एस.ए. वरिष्ठ फुटबॉल लीग स्पर्धा

कोल्हापूर : के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ व दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ यांच्यातील सामना १-१ असा, तर पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत राहिला. या सर्व चारही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.

छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारी प्रॅक्टिस ‘अ’ व तुल्यबळ दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ यांच्यात सामना झाला. दोन्ही संघांच्या आघाडीवीरांकडून सुरुवातीपासूनच आक्रमक व वेगवान चाली झाल्या. यात दहाव्या मिनिटाला ‘प्रॅक्टिस’कडून ओंकार मोरे याने गोलक्षेत्राच्या बाहेरून मारलेल्या फटक्यात चेंडूने गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला. त्यामुळे आपसूकच संघास १-० अशी आघाडी मिळाली. ती फार काळ टिकली नाही. बाराव्या मिनिटास ‘दिलबहार’कडून जावेद जमादारने मैदानी गोलची नोंद करीत संघास १-१ असे बरोबरीत आणले. उत्तरार्धात ‘प्रॅक्टिस’कडून कैलास पाटील, इमॅन्युएल, इंद्रजित चौगुले, राहुल पाटील, ओंकार मोरे, आकाश माळी यांनी आघाडी घेण्यासाठी चढाया केल्या; तर दिलबहारकडून अ‍ॅबिओ, शुभम माळी, राहुल तळेकर, जावेद जमादार, रोमॅरिक यांनीही तितक्याच जोरदारपणे चढाया करीत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही संघांना अखेरपर्यंत यश आले नाही. परिणामी हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला.पाटाकडील ‘ब’ व उत्तरेश्वर प्रासादिक यांच्यात झालेला सामनाही २-२ असा बरोबरीत राहिला. सामन्यांच्या पूर्वार्धात उत्तरेश्वरच्या ओंकार खोपकर याने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ४९ व्या मिनिटाला सिद्धेश यादव याने गोल करीत संघाची ही आघाडी २-० अशी वाढविली. दोन गोलचे ओझे घेऊन खेळणाऱ्या पाटाकडील ‘ब’कडून आघाडी कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. यात ६३ व्या मिनिटाला वैभव देसाई याने गोल करीत संघाची आघाडी २-१ ने कमी केली.

त्यानंतर ८५ व्या मिनिटास आशिष घाटगे याने गोल करीत संघास २-२ असे बरोबरीत आणले. ‘पाटाकडील’कडून सार्थक राऊत, साईराज पाटील, संग्राम शिंदे, यश देवणे; तर उत्तरेश्वरकडून श्लोक साठम, ओंकार कोपकर, अक्षय मंडलिक, अजिंक्य शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ केला. अखेरीस हा सामना २-२ असा बरोबरीत राहिला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल