शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा विद्यार्थी वसतिगृहाची जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 10:38 IST

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या माध्यमातून राज्यातील पहिले वसतिगृह गेल्या वर्षी सुरूझाले. राजर्षी शाहू महाराजांनी ...

ठळक मुद्देमराठा विद्यार्थी वसतिगृहाची जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियाएकूण ७२ जागा; आवश्यक सुविधा उपलब्ध

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या माध्यमातून राज्यातील पहिले वसतिगृह गेल्या वर्षी सुरूझाले. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी त्याकाळी वसतिगृहांची उभारणी करून शिक्षणापासून वंचित असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. तोच विचार डोळ्यांसमोर ठेऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह सुरूकरून दुर्बल आणि वंचित घटकाला शिक्षणासाठी शासनाकडून पाठबळ देण्यात आले आहे. या वसतिगृहाची यंदाची प्रवेश प्रकिया जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.गतवर्षी राज्य शासनाने आर्थिक मागास विशेषत: मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शहराच्या ठिकाणी राहण्याची सोय व्हावी, या दृष्टिकोनातून मराठा वसतिगृहे स्थापन करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्याजिल्ह्यांत मराठा वसतिगृहे सुरूकरण्यास प्राधान्य दिले. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यातूनच राज्यातील पहिले मराठा वसतिगृह कोल्हापुरात स्थापन करण्याच्या शासनाच्या उपक्रमात महसूलमंत्री पाटील यांनी सक्रिय पुढाकार घेऊन मराठा वसतिगृहाची संकल्पना ३ आॅगस्ट २०१८ रोजी सत्यात उतरविली.

कोल्हापुरातील सदर बाजार, विचारेमाळ परिसरातील शाहू कॉलेजशेजारील शासकीय निवासस्थान परिसरात राज्यातील पहिले मराठा वसतिगृह उभे राहिले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची राहण्याची सोय झाली आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या व्यवस्थापनाखाली सद्या कोल्हापुरातील मराठा वसतिगृहे सुरूआहेत. या वसतिगृहात ७२ विद्यार्थी क्षमता आहे.

वसतिगृहात विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, अंघोळीसाठी गरम पाणी, अभ्यासिका, २४ तास सिक्युरिटी, आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या वसतिगृह इमारतीमध्ये तळमजला पार्किंग करण्यात आले असून, सर्व खोल्यांना आकर्षक फरशा, कपाटे, शौचालय, बाथरूम अशा आवश्यक गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. रेक्टर म्हणून निवृत्त कॅप्टन महादेव यादव कार्यरत आहेत.

लवकरच संस्थेची नियुक्तीया वसतिगृहात पहिल्या वर्षी ५० विद्यार्थी प्रवेशित होते. यावर्षी विविध शिक्षण संस्था, महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या वसतिगृहातील प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. वसतिगृह चालविण्यासाठी संस्थेची नियुक्ती लवकरच करण्यात येईल. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती वसतिगृहाचे सदस्य सचिव प्रशांत पट्टलवार यांनी सोमवारी दिली. 

 

टॅग्स :marathaमराठाEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर