शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकाचा बंगला फोडला, रोकडसह दहा तोळे सोन्याचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:37 IST

कसबा बावडा शासकीय धान्य गोडाऊन रमणमळा परिसरातील उद्योजकाच्या बंद बंगल्याच्या मुख दरवाजाचे कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी ७० हजार रोकड, दहा तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे पावणेचार लाखाचा ऐवज लंपास केल्याचे मंगळवारी दूपारी उघडकीस आले. या घरफोडीने परिसरातील नागरिकांत भिती पसरली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे रमणमळ्यात उद्योजकाचा बंगला फोडलारोकडसह दहा तोळे सोन्याचा ऐवज लंपास

कोल्हापूर : कसबा बावडा शासकीय धान्य गोडाऊन रमणमळा परिसरातील उद्योजकाच्या बंद बंगल्याच्या मुख दरवाजाचे कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी ७० हजार रोकड, दहा तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे पावणेचार लाखाचा ऐवज लंपास केल्याचे मंगळवारी दूपारी उघडकीस आले. या घरफोडीने परिसरातील नागरिकांत भिती पसरली आहे.अधिक माहिती अशी, रमणमळा, शासकीय धान्य गोडाऊन परिसरात उद्योजक अरुण वसंतराव तिरोडकर (वय ७०) यांचा ओमकार दूमजली बंगला आहे. त्यांचे न्यू शाहुपूरीमध्ये वाहनांचे गॅरेज आहे. थोरला मुलगा मुंबई-वाशी येथे कुटूंबासह राहतो. तर मुलगी पुणे येथे आहे. याठिकाणी ते व पत्नी असे दोघेच राहतात.

शुक्रवारी (दि. १) तिरोकडर दाम्पत्य मुलीकडे पुण्याला राहण्यासाठी गेले. गेली तीन दिवस त्यांचा बंगला बंद होता. पत्नी मुलीजवळ राहीली, तर अरुण तिरोडकर हे सोमवारी दूपारी कोल्हापूरला परत आले. घरी आले असता मुख दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आतमध्ये जावून पाहिले असता खाली आणि वरच्या बेडरुममधील कपाटातील व बेडच्या कप्प्यातील साहित्य विस्कटलेले दिसले.

त्यांनी पत्नीला फोनवरुन कपाटातील दागिन्यांची व पैशाची विचारपूस केली असता त्यांनी कपाटामध्ये प्लॅस्टीक पिशवीमध्ये ७० हजार रुपये ठेवले होते. तसेच दहा तोळ्याच्या आसपास दागिने होते. उर्वरीत दागिने त्या सोबत घेवून गेल्या होत्या.

घरफोडीची वर्दी मिळताच पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील सहकार्यांसमवेत घटनास्थळी आले. त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली. ठसे तज्ज्ञांकडून तपासणी केली. श्वानाद्वारे चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातच घुटमळले.चोरट्यांचे धाडसतिरोडकर यांच्या शेजारीच पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांचा बंगला आहे. त्यांच्या कुटूंबियांना शेजारी झालेल्या घरफोडीची कल्पनाही नव्हती. याच परिसरात शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे राहतात.

हाकेच्या अंतरावर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि निवासस्थान आहे. पोलीसांचे आजूबाजूला वास्तव्य असतानाही चोरट्यांनी घरफोडीचे धाडस केले. चार महिन्यापूर्वी याच परिसरातील एका अपार्टमेंन्टमधील बंद फलॅट चोरट्यांनी फोडून लाखाचा ऐवज लंपास केला होता. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर