महाद्वार बंद, विसर्जनासाठी मार्ग निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:27 AM2021-09-18T04:27:30+5:302021-09-18T04:27:30+5:30

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढण्याचे शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन व्हावे. याकरिता मिरवणूक मार्ग आखून ...

The entrance is closed, the path for immersion is fixed | महाद्वार बंद, विसर्जनासाठी मार्ग निश्चित

महाद्वार बंद, विसर्जनासाठी मार्ग निश्चित

Next

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढण्याचे शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन व्हावे. याकरिता मिरवणूक मार्ग आखून देण्यात आला आहे.

मार्ग असा,

- संभाजीनगर, न्यू महाद्वार रोड, शाहू बँक, मंगळवार पेठ या परिसरातील गणेशमूर्ती नंगीवली चौक आठ नंबर शाळेमार्गे इराणी खणीकडे जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा.

- राजारामपुरी, जवाहरनगर, सुभाषनगर येथील गणेश मंडळे सायबर चौक, आयसोलेशन हाॅस्पिटल, संभाजीनगर बसस्थानक मार्गे इराणी खणीकडे मार्गस्थ होतील.

- उद्यमनगर, बागल चौक, शाहू मिल, राजारामपुरी, टाकाळा परिसरातील गणेश मंडळे गोखले काॅलेज, हाॅकी स्टेडियम, संभाजीनगर मार्गे इराणी खणीकडे रवाना होतील.

- शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठेतील मंडळे गंगावेश, रंकाळा टाॅवर मार्गे इराणी खणीकडे जातील.

- लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, परिसरातील मंडळे बिंदु चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी, गंगावेश मार्गे इराणी खणीकडे जातील.

मिरवणुकीसाठी प्रसिद्ध मंडळांच्या भेटीला अधिकारी

गेले काही वर्षे खास मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातील काही मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यात कार्यकर्त्यांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, आदी अधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे प्रबोधन केले.

Web Title: The entrance is closed, the path for immersion is fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.