शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

आधी इंटरनेट द्या, मग ‘आयटी’चे बोला :- कोल्हापुरातील उद्योजकांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:57 IST

त्यानंतर सन २००८ मध्ये शासनाने हा पार्क खासगी कंपनीला चालविण्यासाठी दिला आहे. यानंतर २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या युती सरकारने याबाबत कोणतेच ठोस धोरण आखले नाही. त्यामुळे आयटी पार्कचे घोंगडे भिजत पडले आहे.

ठळक मुद्देजागा हस्तांतरणांचेही त्रांगडे; दोन्ही सरकारच्या काळात ठोस मदत नाहीच

संतोष मिठारी ।कोल्हापूर : शासनाची कोणतीही ठोस मदत नसताना केवळ स्वत:च्या ताकदीवर कोल्हापुरातील आयटी इंडस्ट्रीज कार्यरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून याठिकाणी मोठा आयटी पार्क उभा करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, आरक्षित केलेली जागा आधी हस्तांतरण करा. पुरेशी इंटरनेट कनेक्टिव्हीटी द्या. विमानसेवेत सातत्य राखा, अशी मागणी आयटी उद्योजकांची आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी (दि. १३) कोल्हापुरात सभा झाली. त्यामध्ये त्यांनी मोठा आयटी पार्क उभारण्याचे आश्वासन दिले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सध्याच्या आयटी इंडस्ट्रीजची स्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, बीपीओ, आदी माध्यमांतून कोल्हापुरातील स्थानिक उद्योजकांची संख्या, त्यांच्या व्यवसायाची उलाढाल गेल्या २५ वर्षांमध्ये वाढली आहे. अशा परिस्थितीत व्यवसायाची क्षमता वाढविण्यासाठी विस्तार आवश्यक असल्याने आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूर अंतर्गत ते संघटित झाले. या असोसिएशनद्वारे त्यांनी स्वतंत्र, नवा पार्क उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला महानगरपालिकेने सकारात्मक साथ देत टेंबलाईवाडीतील टिंबर मार्केट परिसरातील साडेतीन एकर जागा मंजूर केली.

कौशल्य असलेले मनुष्यबळ, नैसर्गिक अनुकुलता आणि बंगलोर, गोवा, हैदराबाद यांच्याशी असलेल्या दळणवळणाच्या संलग्नतेमुळे देशातील आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. कोल्हापूरमध्ये अँड्रॉईड, डॉटनेट अशा सर्व तंत्रज्ञानांवर काम चालते. (पान ४ वर) येथील आयटी इंडस्ट्रीजवर सुमारे ७०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असून, वार्षिक उलाढाल सुमारे ६० कोटींपर्यंत आहे. सुमारे साडेपाच हजारजणांना रोजगार मिळाला आहे. स्थानिक आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी असोसिएशनने कोल्हापूर आयटी पार्कच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन, महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. त्यावर गेल्या चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने टेंबलाईवाडी परिसरात सव्वा तीन एकर जागा आयटी पार्कसाठी आरक्षित केली आहे. मात्र, अजून ती जागा असोसिएशनकडे हस्तांतरित झालेली नाही. या जागेसह आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता लवकर होणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.शासनाचे धोरण चुकलेराज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १ मे २००२ रोजी कोल्हापुरातील पद्मावतीनगर परिसरात आयटी पार्कचे उद्घाटन झाले. या पार्कमध्ये २२ हजार स्क्वेअर फुटांची मोठी इमारत उभारून पायाभूत सुविधा तातडीने पुरविण्यात आल्या. बाहेरील कंपन्यांना संधी देण्याचे तत्कालीन शासनाचे धोरण चुकले आणि त्याचा फटका या पार्कला बसला. त्यानंतर सन २००८ मध्ये शासनाने हा पार्क खासगी कंपनीला चालविण्यासाठी दिला आहे. यानंतर २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या युती सरकारने याबाबत कोणतेच ठोस धोरण आखले नाही. त्यामुळे आयटी पार्कचे घोंगडे भिजत पडले आहे. 

स्थानिक आयटी उद्योजकांकडून उपलब्ध होणाऱ्या रोजगारांची संख्या वाढत आहे. ते लक्षात घेऊन आयटी पार्कसाठी महापालिकेने आरक्षित केलेली जागा असोसिएशनकडे लवकर हस्तांरित करावी. त्यामध्ये काही अडचणी असल्यास त्याची माहिती महापालिकेने द्यावी.- एस. डी. सुर्वे, अध्यक्ष, आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूरसध्या कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आहे. याठिकाणी बाहेरील देशातील कामे घेणे आणि स्थानिक उद्योगांना संगणक प्रणाली, तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे अशा दोन पद्धतीमध्ये आयटीचे काम चालते. सध्या कोल्हापूर हे आयटी इंडस्ट्रीजचा विकास, वाढीसाठी पोषक शहर आहे. त्यामुळे येथे पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याची गरज आहे. त्यामध्ये जागा उपलब्ध करून देणे. इंटरनेटची कनेक्टिव्हीटी वाढविणे. विमानसेवेतील सातत्य कायम ठेवणे, आदींचा समावेश आहे.- विनय गुप्ते, आयटी उद्योजककोल्हापूरमध्ये आयटी पार्क हा होणे काळाची गरज आहे. त्याबरोबरच येथे मोठी कॉर्पोरेट कंपनी येणे आवश्यक आहे. त्यामुळे वर्किंग क्लचर तयार होईल. त्याचा स्थानिक कंपन्या आणि पदवी घेऊन बाहेर पडणाºया युवा पिढीला फायदा होईल. - ओंकार देशपांडे, आयटी उद्योजक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरITमाहिती तंत्रज्ञान