शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करा, हमाल पंचायतचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 26, 2024 16:07 IST

कोल्हापूर : माथाडी कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करा, कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार असलेले विधेयक विनाविलंब मागे घ्या, गोंधळ निर्माण ...

कोल्हापूर : माथाडी कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करा, कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार असलेले विधेयक विनाविलंब मागे घ्या, गोंधळ निर्माण करणारे पणन संचालकांचे परिपत्रक तात्काळ मागे घ्या, बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे २०१८ सालचे विधेयक मागे घ्या अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदाेलन सुरु करण्यात आले. न्याय्य हक्कासाठी या कष्टकऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासनाचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव हे मुंबईत आंदाेलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरातील कामगारांनीदेखील बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यात जिल्ह्यातील २०० हून अधिक माथाडी कामगार सहभागी झाले. माथाडी कामगारांच्या पाल्यांना माथाडी मंडळात प्राधान्याने नोकरी द्या, गोदामातील माथाडी कामगारांची थकबाकी माथाडी मंडळात भरावे, महागाई निर्देशांकाची रक्कम गोदामातील माथाडी कामगारांना देण्यात यावी, माथाडी मंडळात नोकरभरती सुरु करून त्यात कामगारांच्या मुला-मुलींची प्राधान्याने भरती करावी, जिल्ह्यातील सर्व सिमेंट कंपन्यांच्या गोडावूनमध्ये कायद्याची अंमलबजावणी व्हावी, माथाडी मंडळाकडे नोंद असणाऱ्या, हमालीची रक्कम न देणाऱ्या आस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल करा, विमा योजनेचा लाभ कामगारांना मिळावा अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्ष नाथा राजगे, सचिव कृष्णात चौगले, गाेरख लेडव, रुद्राप्पा तेली, नेताजी गोडसे, हबीब मुजावर, मोहिदहुसेन सय्यद, भिकाजी पाटील, जनार्दन येडगे, परमेश्वर काकडे, साताप्पा जाधव, अनिल बारड यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलन