शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीत कुडकुडणार पोरगं पाहिलं अन् तात्यांचे मन हेलावलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:54 IST

kolhapur News-पंचगंगा घाटावर मुंडन सुरू असताना थंडीत नऊ-दहा वर्षाच्या एका मुलाला कुडकुडताना पाहून अंत्यदर्शनासाठी तेथे गेलेले फुलेवाडीतील संभाजी पांडुरंग जाधव (मिठारी तात्या) अस्वस्थ झाले. त्यांनी घाटावर गरम पाणी मिळण्यासाठी सोलर बसवण्याची कल्पना डोक्यात आणली आणि त्यांनी लगेच ती सत्यातही उतरवली. तत्काळ घरी जाऊन त्याची अंलबजावणी केली. तात्यांनी बसवलेला तोच सोलर आज पंचगंगा घाटावरील स्मशानभूमीत दिमाखात उभा आहे.

ठळक मुद्देस्मशानभूमीत कुडकुडणार पोरगं पाहिलं अन् तात्यांचे मन हेलावलं पंचगंगा घाटावर बसवला गरम पाण्यासाठी सोलर

ज्योती पाटीलपाचगाव : पंचगंगा घाटावर मुंडन सुरू असताना थंडीत नऊ-दहा वर्षाच्या एका मुलाला कुडकुडताना पाहून अंत्यदर्शनासाठी तेथे गेलेले फुलेवाडीतील मिठारी तात्यांचे मन हेलावलं. ते अस्वस्थ झाले. त्यांनी घाटावर गरम पाणी मिळण्यासाठी सोलर बसवण्याची कल्पना डोक्यात आणली आणि त्यांनी लगेच ती सत्यातही उतरवली. तत्काळ घरी जाऊन त्याची अंलबजावणी केली. तात्यांनी बसवलेला तोच सोलर आज पंचगंगा घाटावरील स्मशानभूमीत दिमाखात उभा आहे.

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले संभाजी जाधव हे फुलेवाडी परिसरात मिठारी तात्या या नावाने सर्वपरिचित असणारे व्यक्तिमत्व. त्यांना सर्वजण तात्या म्हणूनच हाक मारतात. पन्नाशी उलटून गेलेल्या तात्यांचा शेती हाच व्यवसाय असून जोडीला पिठाची गिरणीही चालवतात, यामध्ये त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहे.

फुलेवाडी ते रिंगरोड भागात कोणाचाही मृत्यू झाला की गेल पहिला फोन तात्यांना येतो. तात्या वेळ, काळ न बघता अशा कामात तत्काळ मदतीला धावून जातात. कोणी त्यांना याबद्दल विचारले की तात्यांचं ठरलेलं  वाक्य हमखास कानी पडणारच,'...शेवटच्या घडीला आपण त्याला साथ दिली न्हाई तर आजवर त्यानं मला तोंडभरून हाक मारलेल्या त्या हाकेला काही अर्थ राहील का?' त्यांची माणुसकी आणि समाजाबद्दल असलेले प्रेम व आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा उत्साह आजच्या तरुण पिढीला दिशा देणाराच म्हणावा लागेल.

यामागे तात्यांचे  कोणतेही राजकीय कारण नाही, कोणताही स्वार्थ नाही की कसली कधी अपेक्षा नाही. गिरणीतून मिळणार्‍या रोजच्या कमाईतून एक ठराविक वाटा अशा कामांसाठी तात्यांनी काढलेला असतोच.

सकाळी ७ ची वेळ. कोणा एका गल्लीतल्या अंत्ययात्रेसोबत त्या व्यक्तीच्या अंत्यदर्शनासाठी पंचगंगा घाटावर गेलेल्या फक्त मिठारी तात्यांनाच त्या पोराची हुडहुडी जाणवली. इतक्या लोकांनी इतकी वर्षे अशी अनेक दृष्य पाहिली असतील, पण वाईट वाटून तत्काळ कृती करण्याची भूतदया फक्त तात्यानीच दाखवली आणि त्यांनी तेथे तत्काळ गरम पाण्यासाठी सोलर बसविला. हेच खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन म्हणावे लागेल. देव माणसातही आहे, तात्यांच्या या कामगिरीतून याचाच खऱ्या अर्थाने प्रत्यय आल्याचे सिद्ध झाले आहे.

यामागे कोणतीही राजकीय भावना नाही की कशाची अपेक्षा नाही. फक्त मला झालेली जाणीव आणि माणुसकीच्या भावनेतून मी हा प्रयत्न केलेला आहे. पंचगंगा स्मशानभूमीत बसवलेला हा सोलर वॉटर हिटर सर्वांच्या उपयोगी पडावा, हीच यापाठीमागची भावना आहे. संभाजी पांडुरंग जाधव,  (मिठारी तात्या), फुलेवाडी.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर