शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

"संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा अन्...", मुस्लीम बोर्डींगची मागणी 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 15, 2024 23:05 IST

मुस्लीम बोर्डींगची मागणी 

कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण देत गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्यांक मुस्लीम समाजातील घरे, दुकानांची फोडाफोडी, दगडफेक व नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. या प्रकाराला संभाजीराजे छत्रपती जबाबदार असून त्यांना ताबडतोब अटक करावी, पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे पोलीस अधीक्षकांची बदली करावी व जातीय दंगली घडविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मोहामेडन एज्युकेशन सोसायटी म्हणजे मुस्लीम बोर्डीगने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.चेअरमन गणी आजरेकर व प्रशासक कादर मलबारी यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले. याठिकाणी व हिंदू व मुस्लिमांचे अतिक्रमण असताना केवळ मुस्लिम समाजावर अत्याचार केले गेले. घरांवर-प्रार्थनास्थळांवर दगडफेक, तोडफोड, महिला व लहान मुलांवर अत्याचार केले गेले हे पुरोगामी कोल्हापूरला न शोभणारे आहे. या समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजीराजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व याचे सुत्रधार पुण्याचा रविंद्र पडवळ यांच्याकडून नियोजनपूर्वक यासाठी रसद पुरवली गेली.जमावबंदी असताना मोर्चा निघालाच कसा, अतिक्रमणविरोधी मोर्चा असताना हल्ला का केला गेला, गजापूरमध्ये कोणताही विषय नसताना तेथील मुस्लिम समाजावर अत्याचार का केले गेले. पोलीसांना मारहाण, पत्रकारांना धमकावण्याचा प्रकार झाले. विशाळगडावर जाण्यासाठी एकच रस्ता आहे, तेथे पोलीसांनी समाजकंटकांना हत्यारासह सोडले, नागरिकांना सुरक्षा न देता बघ्याची भूमिका घेतली.तरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते यांच्यावर कडक कलमे लाऊन सरकारी कामात अडथळा, पोलीसांवर हल्ला, महिलांचे विनयभंग, घरफोडी, लुटालुट,, प्रार्थनास्थळावर दगडफेक, धार्मिक ग्रंथ पेटविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदाेलन व विराट मुक मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शकिल अत्तार, रफिक मुल्ला, अब्दुलरहिम बागवान, गुलाब मुजावर, हुसेन मुजावर, सरफराज जमादार, जाफर मुजावर. अहमद मुजावर. सलीम अत्तार यांच्यासह मुस्लीम बांधव माेठ्या संख्येने उपस्थित होते.'हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रतिक्रियांवर निर्बंध घाला'दरम्यान सांगलीतील एमआयएम संघटनेच्यावतीनेदेखील डॉ. महेश कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानेही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. त्यामुळे हिंदुत्ववादी नेत्यांच्या विशाळगडाबाबतच्या प्रतिक्रियांवर निर्बंध घालावेत. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली. यावेळी सुफियान पठाणे, सद्दाम सय्यद, साहिल देशनूर, सिकंदर जमादार, सैफअली शेख, सुफीयान पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMuslimमुस्लीम