शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राजारामपुरीत व्यापाऱ्यांचे अतिक्रमण उद्धवस्त; कारवाई दरम्यान शिवीगाळ, अंगावर धावून जाण्याचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 19:25 IST

कारवाई दरम्यान शिवीगाळ तसेच अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात राखली.

कोल्हापूर : दुकानासमोर वाहने लावण्यासाठी सोडलेल्या जागेवर व्यापाऱ्यांकडून झालेले अतिक्रमण आज, बुधवारी महानगरपालिका प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त केल. या कारवाईने व्यापारी वर्गात एकच धावपळ उडाली. अतिक्रमण काढताना दोन ठिकाणी व्यापारी, कर्मचारी यांच्यात वादावादी झाली. शिवीगाळ तसेच अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात राखली.काल, मंगळवारी राजारामपुरीतील जगदाळे हॉल जवळील उद्यानात पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घेऊन राजारामपुरीतील सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढून टाका, अशा सक्त सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धडक कारवाईचा कार्यक्रम आखून दिला. नगररचना विभागातील उपशहर रचनाकार रमेश मस्कर, विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता बाबुराव दबडे यांनी मंगळवारी दुपारनंतर सर्वेक्षण केले. त्यानंतर प्रत्यक्ष आज, बुधवारी दुपारी धडक कारवाईला सुरवात केली.प्रशासकांनी केली कारवाईची पाहणीप्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी दुपारी राजारामपुरी परिसराला भेट देऊन कारवाईची पाहणी केली. तसेच कोणाची गय करु नका, झालेले सर्व अतिक्रमण काढून टाका अशा सूचना दिल्या. कारवाईवेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही

टॅग्स :kolhapurकोल्हापूर