शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सुटी दिवशी महसूलचे कर्मचारी कामावर, पगार कपातीचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 17:02 IST

सरकारी कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या काळात पुकारलेल्या संप काळातील पगार कपातीचे आदेश सरकारने दिल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. दुसºया शनिवारी सुटी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी व तहसील कार्यालयांमधील कामकाज सुरू राहिले. रविवारीही ते सुरू राहणार असून, प्रलंबित कामांचा निपटारा केला जाणार आहे.

ठळक मुद्देसुटी दिवशी महसूलचे कर्मचारी कामावर, पगार कपातीचा धसका कोल्हापूर जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील कार्यालयातील चित्र

कोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या काळात पुकारलेल्या संप काळातील पगार कपातीचे आदेश सरकारने दिल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. दुसऱ्या शनिवारी सुटी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी व तहसील कार्यालयांमधील कामकाज सुरू राहिले. रविवारीही ते सुरू राहणार असून, प्रलंबित कामांचा निपटारा केला जाणार आहे.सातवा वेतन आयोगासह जुनी पेन्शन लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेसह सरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीतर्फे ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते.

९ आॅगस्टला दुपारी हा संप मागे घेण्यात आला. या तीन दिवसांत जमिनीसंदर्भातील दाव्यांची प्रकरणे, विभागीय आयुक्त कार्यालयाशी संबंधित प्रकरणे, बंदूक परवान्यांची प्रकरणे, भूसंपादन संदर्भातील प्रकरणे, ग्रामपंचायत विभागातील न्यायप्रविष्ट प्रकरणे, टपालामधून आलेली प्रकरणे, तसेच तलाठ्यांकडून दिले जाणारे दाखले आणि सात-बारा उतारे यांचेही काम प्रलंबित राहिले.

सरकारने संप काळातील तीन दिवसांचा पगार कपातीचे आदेश दिले. त्यामुळे धास्तावलेल्या कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्याना सुटी दिवशी येऊन आपली प्रलंबित कामे करावीत असे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभाग, गृहविभाग, जमीन विभाग, भूसंपादन विभाग, ग्रामपंचायत विभाग, ‘एनआयसी’ विभागात सुरू असलेले सात-बारा व दाखल्यांचे काम, या सर्व विभागात सकाळी नऊ वाजल्यापासून कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्याकडून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व दफ्तर लावण्याचे काम सुरू होते.

सुटी असूनही दुपारपर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे हे कार्यालयात येऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. दुपारनंतरही ते कार्यालयीन वेळेत थांबून राहिले. या व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांशिवाय ही कार्यालये सुरू होती. सर्व प्रांताधिकारी, तहसील कार्यालय, राजपत्रित अधिकारी यांनी संपातून माघार घेतल्याने ते संप काळात कामावर आल्याने त्यांनी शनिवारी उपस्थित राहण्याचा प्रश्नच नव्हता; परंतु पगार कपातीच्या धास्तीने ज्या विभागाची कामे प्रलंबित आहेत, ते सर्व कर्मचारी कार्यालयांमध्ये थांबून होते.

या प्रकरणांचा निपटारा झाला तरी त्यावर अधिकाऱ्यांकडून सह्या या सोमवारीच होणार आहेत. शनिवार व रविवार असे दोन दिवस कार्यालये सुरू राहणार असतील, तर संघटनेकडून हे जाहीर होणे अपेक्षित होते. कारण लोकांना हे समजले असते तर ते कामानिमित्त या ठिकाणी आले असते. त्यामुळे लोकांपेक्षा आपला पगार वाचविण्याची धडपड कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आली.

...तर स्वातंत्र्यदिनीही काम सुरू राहणारसंपकाळातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारसह आवश्यकता वाटल्यास स्वातंत्र्यदिनीही कर्मचारी कामावर येणार आहेत. तसेच पुढील शनिवार व रविवारसह इतरवेळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही थांबून कर्मचारी प्रलंबित कामे पूर्ण करणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संपkolhapurकोल्हापूर