शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

खरीप हंगामात आपत्कालीन पीक नियोजन आराखडा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:05 IST

आगामी खरीप हंगामात कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार केला असून त्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात पिकाचा सर्वसाधारण पेरणी कालावधी असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देखरीप हंगामात आपत्कालीन पीक नियोजन आराखडा निश्चितजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांची माहिती

कोल्हापूर : आगामी खरीप हंगामात कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार केला असून त्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात पिकाचा सर्वसाधारण पेरणी कालावधी असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.या आराखड्यानुसार खरीपातील जिरायत पिकांसाठी जूनचा पहिला ते जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नागलीचा पेरणी कालावधी, जूनचा पहिला ते जुलैचा पहिला आठवडा सोयाबीन पेरणी कालावधी, जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा ज्वारीचा सर्वसाधारण पेरणी कालावधी तर जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा भुईमूग पेरणीचा सर्वसाधारण कालावधी निश्चित केला आहे.बागायत पिकांसाठी मे चौथा ते जुलैचा पहिला आठवडा सोयाबीन पेरणी कालावधी, जूनचा दुसरा त जुलैचा पहिला आठवडा ज्वारीचा पेरणी कालावधी आणि मेचा तिसरा ते जूनचा पहिला आठवडा भातासाठी पेरणी कालावधी निश्चित केला आहे.सोयाबीन पिकाची सर्वसाधारण उगवण क्षमता ही 70 टक्के गृहित धरून प्रति एकरी 30 किलो बियाणे प्रमाण असते. तथापि बियाणे संचालकांच्या सूचनेनुसार सोयाबीन पिकाची उगवण क्षमता ही 65 टक्के गृहित धरून प्रति एकरी बियाणे प्रमाण वाढवण्याची सूचना केली आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर