शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कोल्हापूरच्या हद्दवाढविरोधात एल्गार, पालकमंत्र्यांसमोरच आमदार नरके, महाडिक यांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:45 IST

पालकमंत्री आबिटकर यांचीही सावध भूमिका

कोल्हापूर : शहरातून ग्रामीण भागात राहायला येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पूर्वी शहरात जात होते ते आता गावाकडे येत आहेत. उलटा प्रवास सुरू आहे. यामुळे हद्दवाढीस ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. विरोध डावलून हद्दवाढ केल्यास आक्रमकपणे आंदोलन केले जाईल, असा थेट इशारा रविवारी शिंदेसेनेचे म्हणजे स्वपक्षाचेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना रविवारी दिला. यावेळी उपस्थित असलेले भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी येथे जाहीर भाष्य केले नाही. पण त्यांचे समर्थक सरपंच आक्रमकपणे हद्दवाढीला विरोध केला. महायुतीतील आमदार नरके, महाडिक यांनी हद्दवाढविरोधी एल्गार पुकारल्याने पालकमंत्री आबिटकर यांना सावध पवित्रा घ्यावा लागला. त्यांनी या दोन आमदार आणि हद्दवाढविरोधी सरपंच यांच्यासमोर अधिक काही भाष्य करणे टाळले.पालकमंत्री आबिटकर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी हद्दवाढविरोधी गावांतील सरपंचांचे शिष्टमंडळाने आमदार नरके, आमदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री आबिटकर, सहपालकमंत्री मिसाळ यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली.आमदार नरके म्हणाले, मूळ शहराचा विकास झालेला नाही. अनेक प्रश्न जैसे थे आहेत. आता शहरातून ग्रामीण जाण्याचा ओघ वाढला आहे. यामुळे शहरालगतच्या गावांवर शहरातील लोकांमुळे अतिरिक्त ताण येत आहे. म्हणून शहराच्या जवळ असलेल्या गावांचा विकास होण्यासाठी प्राधिकरणाला दोन हजार कोटींचा निधी द्यावा. प्राधिकरण सक्षम करावे. यासाठी नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घ्यावी.यावेळी पाचगाव सरपंच प्रियंका पाटील, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण उचगाव सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडी सरपंच उत्तम आंबवडे, पाचगावचे नारायण गाडगीळ, मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले, बालिंगे सरपंच राखी भवड, माजी सरपंच मयूर जांभळे, पूजा जांभळे, वाडीपीरचे सरपंच अनिता खोत, उपसरपंच सागर लाड, नागदेवाडी सरपंच अमृता पोवार, वडणगे सरपंच संगीता पाटील, आंबेवाडी सरपंच सुनंदा पाटील, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, उचगाव सरपंच मधुकर चव्हाण आदी उपस्थित होते.

आम्ही काय अतिरेकी आहे का?हद्दवाढविरोधी गावांतील सरपंच मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले होते. तेथे प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता. आमदार नरके यांनीही इतका बंदोबस्त कशासाठी, अशी विचारणा केली. अनेक उपस्थित सरपंचांनी आम्ही काय अतिरेकी आहे का? अशीही विचारणाही केली.

सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा निर्णयपत्रकारांशी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शहरातील कृती समिती हद्दवाढीची मागणी करीत आहे, तर शहरालगतची गावे विरोध करीत आहेत. हद्दवाढीच्या विरोधासाठी काही लोकप्रतिनिधींनीही भेट घेतली आहे. यामुळे हद्दवाढीचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPlanning Commissionनियोजन आयोगguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकरAmal Mahadikअमल महाडिक