शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

‘भाजप-ताराराणी’च्या यादीत अकरा आजी-माजी नगरसेवक

By admin | Updated: September 27, 2015 00:30 IST

महापालिका निवडणूक : पहिली २१ उमेदवारांची यादी ; विक्रम जरग, परमार, प्रकाश मोहितेंना संधी

कोल्हापूर : भाजप, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी संघटनेच्यावतीने महापालिकेच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील २१ उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये आजी-माजी अकरा नगरसेवकांना स्थान मिळाले आहे. जाहीर झालेले उमेदवारही अपेक्षेप्रमाणेच आहेत. पहिल्या यादीत रिपब्लिकन पक्षाला मात्र स्थान मिळालेले नाही. भाजपकडून अजित ठाणेकर, शीतल रामुगडे, मामा कोळवणर, श्रुती पाटील यांना संधी मिळाली आहे. ताराराणी आघाडीकडून सत्यजित कदम, किरण शिराळे, ईश्वर परमार, तेजस्विनी रविकिरण इंगवले, विक्रम जरग, आदींना रिंगणात उतरविले आहे. एकवीसपैकी प्रत्येकी दहा जागा भाजप व ताराराणी आघाडी लढविणार आहे. एक जागा स्वाभिमानी संघटनेला दिली आहे. भाजपने पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच प्रामुख्याने संधी दिली आहे. भाजपचे कोल्हापूर महानगराध्यक्ष महेश जाधव, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक व ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी ही यादी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून बाजी मारली. त्यापाठोपाठ आता भाजपने यादी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस व शिवसेना कुणाला संधी देते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. भाजकडून निष्ठावंतांना संधी भाजपने पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व विद्यमान नगरसेवक आर. डी. पाटील यांची कन्या श्रुती पाटील व नगरसेवक सुभाष रामुगडे यांच्या पत्नी शीतल यांना रिंगणात उतरविले आहे. पक्षाच्या युवा मोर्चाचा शहराध्यक्ष संदीप देसाई यांची पत्नी पवित्रा या शिपुगडे तालीम प्रभागातून लढणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निवासस्थान असलेल्या तपोवन प्रभागातून विजय खाडे या कार्यकर्त्यास पक्षाने मैदानात उतरविले आहे. नागाळा पार्क प्रभागातून लढणारे अशोक कोळवणकर हे त्या परिसरात ‘मामा कोळवणकर’ या नावाने प्रसिद्ध आहेत. दहापैकी आठ उमेदवार पक्षाशी निगडित आहेत. रुईकर कॉलनी प्रभागातून उमेदवारी दिलेल्या उमा उदय इंगळे या मात्र नवख्या उमेदवार आहेत. त्यांचे पती यूथ बँकेत नोकरीस आहेत. संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या यशोदा मोहिते या आमदार महाडिक यांचे कार्यकर्ते प्रकाश मोहिते यांच्या पत्नी आहेत. ठाणेकर पुन्हा रिंगणात अजित ठाणेकर यांना गत निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडावा लागला होता. ते महालक्ष्मी मंदिर प्रभागातून इच्छुक होते. तिथे पक्षाने निवडून येण्याच्या क्षमतेवर माजी महापौर नंदकुमार वळंजू यांना उमेदवारी दिली. त्या रागातून त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केले. त्यांच्यावर पक्षाने कारवाईही केली होती; परंतु या निवडणुकीत मात्र त्यांची वर्णी पहिल्याच यादीत लागली आहे. तटाकडील तालीम प्रभागातून ते लढतील. जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांचे निवासस्थान असलेला हा प्रभाग आहे. दोन प्रभाग, दोन पक्ष प्रकाश मोहिते ‘ताराराणी’कडून नाथागोळे प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या पत्नीला भाजपने संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून उमेदवारी दिली आहे. आगामी महापौरपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. ते भाजपच्या वाट्याला जाणार आहे. यशोदा मोहिते या त्या प्रवर्गातील असल्याने तो हिशेब करून मोहिते यांनी ही राजकीय खेळी केली आहे. भाजप-ताराराणी महायुतीची यादी प्र. क्र. प्रभागाचे नाव आरक्षण उमेदवाराचे नाव १२ नागाळा पार्क खुला अशोक कोळवणकर २३ रुईकर कॉलनी खुला महिला उमा उदय इंगळे २९ शिपुगडे तालीम खुला महिला पवित्रा संदीप देसाई ३३ महालक्ष्मी मंदिर ओबीसी महिला श्रुती राम पाटील ३९ राजारामपुरी एक्स्टेंशन खुला विजय महादेव जाधव ४८ तटाकडील तालीम खुला अजित दत्तात्रय ठाणेकर ५६ संभाजीनगर बसस्थानक खुला यशोदा प्रकाश मोहिते ६८ कळंबा फिल्टर हाऊस अनुसूचित जाती महिला शीतल सुभाष रामुगडे ६९ तपोवन ओबीसी खुला विजयसिंह पांडुरंग खाडे ७१ रंकाळा तलाव खुला अमोल सुरेश पालोजी ताराराणी आघाडीचे उमेदवार प्र. क्र. प्रभागाचे नाव आरक्षण उमेदवाराचे नाव ०८ भोसलेवाडी-कदमवाडी खुला सत्यजित शिवाजीराव कदम १० शाहू कॉलेज खुला महिला शुभांगी रमेश भोसले २७ ट्रेझरी आॅफिस खुला महिला मेहजबीन रियाज सुभेदार ३० खोल खंडोबा ओबीसी खुला किरण अण्णासाहेब शिराळे ३२ बिंदू चौक खुला ईश्वर शांतीलाल परमार ४० दौलतनगर खुला विलास भैरू वास्कर ४७ फिरंगाई तालीम खुला महिला तेजस्विनी रविकिरण इंगवले ५५ पद्माराजे उद्यान खुला विक्रम बापूसाहेब जरग ५७ नाथागोळे तालीम खुला प्रकाश महादेव मोहिते ६४ शिवाजी विद्यापीठ- खुला प्रकाश ज्ञानोबा काटे कृषी महाविद्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार प्र. क्र. प्रभागाचे नाव आरक्षण उमेदवाराचे नाव ७ सर्किट हाऊस ओबीसी महिला अर्चना उमेश पागर