शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अकरा महिन्यांनंतर धावली कोल्हापूर-धनबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 19:19 IST

Railway Kolhapur- उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या विशेष रेल्वेचा प्रारंभ शुक्रवारी झाला. कोरोनामुळे थांबलेली ही दीक्षाभूमी एक्स्प्रेस अकरा महिन्यांनंतर पुन्हा धावली. त्यातून पहिल्यादिवशी १९३ जणांनी प्रवास केला. त्यात कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर येथील प्रवाशांचा समावेश होता.

ठळक मुद्दे अकरा महिन्यांनंतर धावली कोल्हापूर-धनबाद पहिल्यादिवशी १९३ जणांचा प्रवास : भाविक, नागरिकांची सोय

कोल्हापूर : उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या विशेष रेल्वेचा प्रारंभ शुक्रवारी झाला. कोरोनामुळे थांबलेली ही दीक्षाभूमी एक्स्प्रेस अकरा महिन्यांनंतर पुन्हा धावली. त्यातून पहिल्यादिवशी १९३ जणांनी प्रवास केला. त्यात कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर येथील प्रवाशांचा समावेश होता.कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून शुक्रवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी ही रेल्वे सुटली. मिरज, कुर्डुवाडी, पंढरपूरमार्गे दुपारी तीनच्यासुमारास रेल्वे लातूरमध्ये पोहोचली. ठिकठिकाणी प्रवासी समिती सदस्यांनी तिचे स्वागत केले. परळी-वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, अकोला, नागपूर, इटारसी, गया, जबलपूर, पारसनाथमार्गे ही रेल्वे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास धनबादला पोहोचणार आहे.

धनबाद येथून दर सोमवारी सकाळी सव्वादहा वाजता ही रेल्वे निघणार असून, आलेल्या मार्गाने परतीचा प्रवास करत बुधवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास कोल्हापूरला पोहोचणार आहे. या रेल्वेला १९ डबे आहेत. त्यातून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षित करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर