शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- ‘बिद्री’, ‘भोगावतीसह दोन हजार संस्थांचे मंगळवारपासून रणधुमाळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:28 IST

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक स्थगितीची मुदत शनिवारी संपणार 

कोल्हापूर : राज्य शासनाने पावसाळ्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. मंगळवार (दि. ३) पासून संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता असून त्याची तयारी सहकार विभागाने सुरू केली आहे. ‘बिद्री’, ‘भोगावती’सह दोन हजार संस्थांची रणधुमाळी सुरू होणार आहे. सर्वाधिक संस्था दुग्ध विभागातील १९१० आहेत.काेरोनामुळे दीड वर्षे सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यानंतर निवडणुका सुरू झाल्या. जूनपर्यंत काही संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पडल्या. मात्र, पावसाळ्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने सप्टेंबरअखेर निवडणुकांना स्थगिती दिली होती. निवडणुकांना जिथे स्थगिती दिली होती, तेथून आता प्रक्रिया सुरू होणार आहे.परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया उमेदवारी अर्जापर्यंत पूर्ण झाली आहे. छाननी बाकी असतानाच स्थगिती आल्याने आता छाननीपासून प्रक्रिया सुरू होणार आहे.‘बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा कारखान्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती. आता थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. आजरा कारखान्याचीही अंतिम यादी प्रसिध्द झाली असून ‘उदयसिंगराव गायकवाड’ व ‘इंदिरा महिला तांबाळे’ यांचीही प्रारूप यादीची प्रक्रिया सुुरू होणार आहे. ‘वारणा’, ‘महालक्ष्मी’ बँकांचा कार्यक्रम सुरू होत आहे.‘भोगावती’, ‘बिद्री’चा प्रचार सुरूऑक्टोबरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होणार हे माहीती असल्याने ‘भोगावती’च्या सत्तारूढ गटाने संपर्क मेळावे सुरू केले आहेत. तर ‘बिद्री’च्या विरोधकांनी सत्तारुढ गटाच्या कारभारावरच आसूड ओढले असून त्याच ताकदीने सत्तारुढ गटाने उत्तर दिले आहे.

दुग्ध विभागाची दमछाक होणारदुग्ध विभागात सहाव्या टप्प्यातील १९१० त्यापाठोपाठ सुमारे ४५० संस्थांच्या निवडणुका होत आहेत. तेथील मनुष्यबळ पाहता अधिकाऱ्यांची दमछाक होणार आहे. आठवड्याला १०० ते १२५ प्रारूप याद्यांचे कार्यक्रम लावण्याची तयारी दुग्ध विभागाने केली आहे.

अशा होणार विभागनिहाय निवडणूका :

दुग्ध संस्था - १९१०बँका, पतसंस्था - ६२साखर कारखाने -  बिद्री, भोगावती, आजरा, उदयसिंगराव गायकवाड, इंदिरा महिला कारखाना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक