शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही सहकारी संस्थांच्या निवडणुका, कोल्हापूर जिल्ह्यात ५० संस्थांची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:32 IST

ऑक्टोबरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी

कोल्हापूर : ऐन पावसाळ्यातही राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. ऑक्टोबरनंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार असल्याने त्या कालावधीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेता येणार नसल्याने राज्य सहकारी प्राधीकरणाने हा निर्णय घेतला आहे.कोरोनापासून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका मुदत होऊ शकलेल्या नाहीत. कोरोना काळात दीड वर्ष प्रक्रिया ठप्प होती, त्याचा परिणाम पुढे दोन वर्षे राहिला. संस्थांच्या निवडणुका लांबत गेल्याने एका एका संस्थेचे संचालक मंडळ सात आठ वर्षे राहिले आहे. साधारणता ऑक्टोबर ते जूनपर्यंतच निवडणुका घेतल्या जातात. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सगळीकडेच पाऊस असल्याने या कालावधीत निवडणुका घेतल्या जात नाहीत. पण यंदा जुलैसंपत आला तरी सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरूच आहेत. याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कारण आहे.महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया निवडणूक विभागाने सुरू केली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेसह हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाली असून, साधारणता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरक्षण सोडत होऊ शकते. आगामी दिवाळी सण पाहता, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या संस्थांचे बिगुल वाजणार, हे निश्चित आहे. या कालावधीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेता येणार नसल्याने प्राधीकरणाने पावसाळ्यातही निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवली आहे.

जिल्ह्यात ५० संस्थांची प्रक्रिया सुरूजिल्ह्यात ‘ब’ वर्गातील २९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर दुग्ध विभागाकडूनही निवडणुकांचे काम सुरू आहे. साधारणत: ५० हून अधिक संस्थांची प्रक्रिया सुरू आहे.