शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'हाऊसिंग फायनान्स'साठी मोर्चेबांधणी; महाविकास-महायुत्तीमध्ये रस्सीखेच 

By विश्वास पाटील | Updated: December 2, 2023 13:01 IST

राज्यभरात संस्थेचे १६१५ मतदार, २४ डिसेंबरला मतदान

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यभरातील गृहनिर्माण सोसायट्या व गृहनिर्माणसाठी अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था मतदार असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर ताबा मिळवण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या संस्थेची निवडणूक २४ डिसेंबरला आहे. राज्यभरात संस्थेचे १६१५ मतदार आहेत.या महामंडळाची सूत्रे आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे आहेत. पवार यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते व्ही.बी. पाटील हे महामंडळाचे गेली पाच वर्षे अध्यक्ष व छत्रपती संभाजीनगरचे सुनील जाधव हे उपाध्यक्ष आहेत. अध्यक्ष पाटील यांनी अर्धा कप चहा न घेताही संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले आहे. माघारीची मुदत १३ डिसेंबरला आहे. २५ जागांसाठी ७२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. राजेंद्र वीर निवडणूक अधिकारी आहेत.प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालये असलेल्या या संस्थेचे राज्यभरात स्वमालकीची एक हजार कोटींची मालमत्ता आहे. राज्य शासनाने या संस्थेला यापूर्वी ६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले. त्याची वसुलीच झालेली नव्हती. आता त्या कामास वेग दिला आहे. सध्या तेच काम सुरू आहे. आताच्या संचालक मंडळात शरद पवार गटाचे ११, अजित पवार यांना मानणारे २, काँग्रेसचे ४ आणि भाजपचे ३, ठाकरे गटाचा एक असे बलाबल आहे. संस्था अजूनही अडचणीत असल्याने निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे.सत्तारुढ आघाडीकडून अध्यक्ष व्ही. बी. पाटील, उपाध्यक्ष सुनील जाधव, अंकुश काकडे, जळगावचे सतीश अण्णा पाटील, अमरावतीचे वसंतराव घुईखेडकर हे उपमुख्यमंत्री पवार, भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर, मुंबईचे सीताराम राणे, नाशिकचे बाळासाहेब सानप यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा करत आहेत. 

निपुन कोरे यांचाही अर्जया निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी जास्त लक्ष घातले आहे. त्यांच्या सूचनेवरूनच वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनीही अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे.

नाशिक, पुण्याचे वर्चस्वया संस्थेचे १६१५ मतदार आहेत. त्यातील १०९८ मतदान नाशिक, पुणे आणि मुंबई विभागाचे मिळून आहेत. मावळत्या संचालक मंडळात या तीन विभागांचे संचालक मंडळातही वर्चस्व होते. त्यांचे २१ पैकी ११ संचालक होते. छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील मतदान ५१७ असून या विभागाचे नऊ संचालक आहेत. आता संचालकांची संख्या २५ झाल्याने सर्वच विभागातील प्रतिनिधित्व वाढणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक