शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार, विभागीय उपनिबंधकांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:02 IST

GokulMilk Kolhapur- गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही, यावरून संभ्रमावस्था असताना गुरुवारी उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, असे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी स्पष्ट केले. प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची सुनावणी मंगळवार (दि. २ मार्च) पासून होणार आहे.

ठळक मुद्देविभागीय उपनिबंधकांचे स्पष्टीकरण हरकतींची सुनावणी मंगळवारपासून

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही, यावरून संभ्रमावस्था असताना गुरुवारी उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, असे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी स्पष्ट केले. प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची सुनावणी मंगळवार (दि. २ मार्च) पासून होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापुरातील बहुचर्चित ह्यगोकुळह्णसह जिल्हा बँक व साखर कारखान्याच्या निवडणुकांनाही स्थगिती आली.

१ एप्रिलपासून स्थगित झालेल्या टप्प्यापासून निवडणुकीची प्रकिया सुरू होईल, असे सांगण्यात आले. तथापि, गुरुवारी यावरून संभ्रम निर्माण झाल्याने विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शनही मागवले; परंतु नंतर त्यांनीच ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करून त्यातील संदिग्धता दूर केली.उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली. प्रारूप याद्यावरील आक्षेप घेण्याची मुदत संपल्याच्या दिवशीच पुन्हा एकदा स्थगितीचा आदेश आला.केर्ली (ता. करवीर) येथील ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्थेने गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुनावणीवर निर्णय देताना गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचाच आधार घेऊन ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात येते; परंतु हा निर्णय सत्तारूढ गटाला कितपत मान्य होतो याबद्दल साशंकता असून त्यावरून पुन्हा न्यायालयीन लढाई होते की काय, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनाची लाट कितपत नियंत्रणात राहते हे देखील निवडणूक होण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर