शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

सोशल प्रचाराचा धुमाकूळ तरी निवडणूक आयोगाचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:43 IST

बारीकसारीक खर्चावरही कटाक्ष ठेवणारे खर्च नियंत्रण पथक मात्र सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या खर्चाकडे कानाडोळा करत आहे. खर्चात धरले जात नाही, धरले तरी नाममात्र हजार ते एक लाख रुपयेच मोजावे लागत असल्याने उमेदवार आणि समर्थकांकडून सोशल अस्त्रालाच जवळ केले जात आहे.

ठळक मुद्देसोशल प्रचाराचा धुमाकूळ तरी निवडणूक आयोगाचा कानाडोळाआयोगाची अवस्था ‘दरवाजा उघडा आणि न्हाणीला बोळा’

कोल्हापूर : बारीकसारीक खर्चावरही कटाक्ष ठेवणारे खर्च नियंत्रण पथक मात्र सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या खर्चाकडे कानाडोळा करत आहे. खर्चात धरले जात नाही, धरले तरी नाममात्र हजार ते एक लाख रुपयेच मोजावे लागत असल्याने उमेदवार आणि समर्थकांकडून सोशल अस्त्रालाच जवळ केले जात आहे.

एका क्लिकवर एका सेकंदात लाखो मतदारापर्यंत पोहोचविणाऱ्या या अस्त्राने निवडणूक लढविण्याचे तंत्र बदलले तरी निवडणूक आयोग बदलापासून लांबच आहे, याचा पुरेपूर लाभ राजकीय पक्ष आणि उमेदवार उठवित आहेत. अजून एकही जाहीर सभा झाली नसली तरी सोशल मीडियावर प्रचाराचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे.२0१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडिया प्रचाराचे साधन म्हणून पुढे आले. पुढील पाच वर्षे त्याचा इतका प्रभाव वाढला, की २0१९ ची निवडणूकही जाहीर सभापेक्षा सोेशल मीडियावरील संदेशावरूनच गाजली. याला कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले हे दोन मतदारसंघही अपवाद राहिले नाहीत.

‘आमचं ठरलंय’ ही टॅगलाईन घेऊन आॅनलाईन प्रचाराचा धुरळा उडविला गेला. जाहीर सभांच्या नियोजनापेक्षा सोशल मीडिया सेल अधिक प्रभावीपणे राबविला गेला. निवडणुकीनंतर खर्चाचा तपशील देताना ७0 लाखांच्या खर्चमर्यादेत सोशल मीडियाचा खर्चाचा नाममात्र ७ ते १६ लाखांपर्यंतचा खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. वास्तविक हा खर्च सादर केलेल्या रकमेच्या पटीत कितीतरी पटीने अधिक होता; पण निवडणूक आयोगाच्या सोशल खर्चाविषयी फारशा अटी, शर्थी नसल्याचा फायदा या उमेदवारांना झाला.आताही याच त्रुटीचा लाभ विधानसभा निवडणुकीतही उचलला जात आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच प्रतिस्पर्धींमध्ये सोशल मीडिया सेल कार्यरत झाले असून, तेथून सोशल वॉर रंगविले जात आहेत. जाहीर आरोप -प्रत्यारोपांच्या जोडीनेच जुन्या आॅडिओ, व्हिडीओ क्लीप दाखवून एकमेकांना शह देण्याचे फंडे राबविले जात आहेत. व्हॉटस अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूबवरील क्लिप आणि एसएमएसवरून रोज नव्या वादाला तोंड फुटत आहे, तरीदेखील निवडणूक आयोग मात्र हे आपल्या कार्यकक्षेतच नाही या अविर्भावात वावरत आहेत.

निवडणूक काळात होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील चार खर्च निरीक्षकांची नियुक्ती झाली आहे. त्यांना साहाय्य करण्यासाठी मतदारसंघनिहाय नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत; पण सोशल मीडियामार्फत होणाऱ्या वारेमाप खर्चाकडे दुर्लक्ष होत आहे; त्यामुळे आयोगाची अवस्था ‘दरवाजा उघडा आणि न्हाणीला बोळा’ अशीच आहे.एका उमेदवाराला खर्च मर्यादा - २८ लाखतीन टप्प्यांत खर्च सादर करावा लागणारलोकसभेला सोशल मीडियावर दाखविलेला खर्च

  1. संजय मंडलिक-१६ लाख ३८ हजार
  2. धनंजय महाडिक-१३ लाख २२ हजार
  3. राजू शेट्टी- आठ लाख २३ हजार
  4. धैर्यशील माने- सात लाख ५६ हजार

५0 लाख एसएमएसना केवळ एक लाख रुपयेआयोगाने सोशल मीडियासाठी स्वतंत्र असा खर्च दाखविलेला नाही. याउलट नेहमीच्या प्रचारासाठीचे खर्चाचे आकडे निश्चित होऊन आले आहेत. बीएसएनएलचे दर गृहीत धरून बल्क एसएमएसचे दर निश्चित केले आहेत. ५0 हजारांच्या आतील एसएमएसना महिन्याला साडेसहा हजार रुपये, एक लाखापर्यंतच्या एसएमएसना १२ हजार, एक ते ५0 लाखांपर्यंतच्या एसएमएसना दरमहा एक लाख रुपये असे दर आयोगाने दिले आहेत. 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाkolhapurकोल्हापूर