शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ यांना लाख मताधिक्याने निवडून आणू, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू; संजय मंडलिक यांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 17:54 IST

मंडलिक यांना खासदार करणार..

मुरगुड : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणून विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, असा निर्धार माजी खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी येथे दिला. मंडलिक गटाच्या वतीने आयोजित भगवा मेळाव्यात ते बोलत होते. मंडलिक आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब असून आमचं आता मनापासून जुळलंय. कुटुंबातील वाद आता मिटलाय, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रा. मंडलिक म्हणाले, यापूर्वी जे झालं ते झालं. यापुढे आपल्याला एकाच मार्गाने जायचे आहे. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मुश्रीफ यांनी संपूर्ण जिल्हाभर लक्ष द्यावे, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल. मुश्रीफ यांना पाठिंबा कसला आम्ही तर घरचेच आहोत. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी रुजविलेल्या पुरोगामीत्वामुळे मुश्रीफ सातत्याने निवडून येतात.मुश्रीफ म्हणाले, आपल्यातील समज-गैरसमज गंगार्पण करूया. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्यामुळेच माझी राजकीय आणि सामाजिक जडणघडण झाली. त्यांच्या पाऊलखुणांवरूनच आयुष्याची वाटचाल सुरू आहे.ॲड. वीरेंद्र मंडलिक म्हणाले, मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू. विकासाचं आणि विचारांचे राजकारण झालं पाहिजे,कार्यक्रमात जयसिंग भोसले, विजय काळे, अनिल सिद्धेश्वर, प्रदीप चव्हाण, श्रीकांत भोसले, भगवान पाटील, राणाप्रताप सासणे, जीवन साळोखे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, आर. डी. पाटील - कुरुकलीकर, केशवकाका पाटील, शिवानीताई भोसले, आनंदराव फराकटे, एन. एस. चौगुले, रामचंद्र सांगले, विश्वास कुराडे, शहाजी यादव, आप्पासाहेब तांबेकर, नंदकुमार पाटील, बाजार समितीचे संचालक बी. जी. पाटील, नामदेवराव मेंडके, दत्तात्रय मंडलिक आदी प्रमुख उपस्थित होते.

मंडलिक यांना खासदार करणार..जय-पराजयाची पर्वा न करता लढणे ही सदाशिवराव मंडलिक यांची शिकवण आहे. प्रा. संजय मंडलिक यांनी एखाद्या पराभवाने खचून जाऊ नये, त्यांना पुढच्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आणणे, ही माझी जबाबदारी आहे. ॲड. वीरेंद्र मंडलिक यांचे राजकीय स्वप्न, सामाजिक जीवनातील इच्छा, आकांक्षा यांचा बॅकलॉग भरून काढू.

तळहाताच्या फोडाप्रमाणे..मंडलिकांच्या कार्यकर्त्यांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन, असे सांगत मंत्री मुश्रीफ म्हणाले, यांच्यात आणि माझ्यात कधीही अंतर येऊ देणार नाही. गट-तट, पक्ष-पार्टी कधीच कुणाला विचारत नाही. आपल्याकडे आलेला माणूस समाधानाने परत जाईल, यासाठीच मी कार्यरत आहे.खिमा-चपाती..वीरेंद्र मंडलिक म्हणाले, लहानपणी शाळेला जाताना सकाळी सहा वाजताच आई डबा करून द्यायची. त्याचवेळी मुश्रीफसाहेब आमच्या घरी यायचे आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक माझ्या आईला सांगायचे की मुश्रीफसाहेब आलेत, त्यांना खिमा-चपाती करून द्या. या धावपळीत माझी आई मला डबा द्यायची विसरून जायची.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफsanjay mandlikसंजय मंडलिकwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024