शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध आई-वडिलांसाठी मुलगीच बनली श्रावणबाळ

By admin | Updated: December 19, 2014 00:28 IST

संसारावर तुळशीपत्र ठेवून सुरू आहे सेवा : समाजातील दानशूरांकडून अश्विनीला हवाय मदतीचा हात

अनिल पाटील -मुरगूड -‘म्हातारपण नको गा देवा’ असा सूर सर्वत्र पाहावयास मिळतो. कारण उतरत्या वयात वृद्ध पती-पत्नीला एकमेकांचाच आधार बनावा लागतो, तर काहींना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागतो; पण याला अपवाद आहे मुरगूडमधील घटना. लग्न होऊन आपल्या पती, मुलांबरोबर आनंदात राहण्याचे सोडून गेल्या तीन वर्षांपासून अश्विनी आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा-शुश्रूषा करत आहे. संधिवाताने दोन्हीही पायाने अधू झालेल्या आपल्या आईला स्वत:च्या पायावर उभा करूनच आपल्या संसाराकडे परतणार, या अश्विनीच्या निश्चयामुळे वंशाला दिवाच पाहिजे, अशा मानसिकतेमध्ये अडकलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे. वृद्ध आई-वडिलांची सेवा करून आधुनिक काळातील ‘श्रावणबाळ’ ठरलेल्या अश्विनीला मात्र आईच्या शस्त्रक्रियेसाठी समाजाचे पाठबळ हवे आहे.कोगनोळी (ता. चिकोडी) येथील आप्पासाहेब कदम हे व्यवसायाने डॉक्टर. अत्यल्प फीमध्ये लोकांवर उपचार करणारे म्हणून त्यांची ओळख. त्यांच्या पत्नी उर्मिला यांना संधिवाताचा त्रास सुरू झाला. अगदी थोडा थोडा वाटणारा त्रास हा पुढे इतका वाढला की, त्यांना चालता, उठता येईना. त्यांना पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च झाला. खर्चापोटी कदम यांनी आपली शेती, जमीन आणि घरही विकले. शस्त्रक्रिया झाली; तरीसुद्धा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. दैवाला दोष देत कदम कुटुंब मुरगूडमध्ये वास्तव्याला आले. पाच वर्षांपूर्वी दिंगणघाट (ता. वर्धा) येथील सधन कुटुंबातील मुलाबरोबर अश्विनीचे लग्न झाले. अश्विनी आपल्या संसारात सुखी होती; पण तीचे मन मात्र आई -वडिलांकडेच धावत होते. शेवटी ती एक वर्षांच्या छोट्या मुलासह मुरगूडमध्ये दाखल झाली आणि आपल्या आईची सेवा सुरू केली; पण नियतीने पुन्हा एकदा प्रताप दाखवला. वडिलांच्या हृदयामध्ये अडथळा निर्माण झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले.शस्त्रक्रियेची गरजसध्या तीन वर्षांपासून अश्विनी मुरगूडमध्येच आई-वडिलांची सेवा करत आहे. आईला तर चालताच येत नाही. वडीलही बेडवरच असल्याने त्यांचा व्यवसायही बंद पडला आहे. आईला पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. डॉक्टरांनी अंदाजे चार लाख रुपये खर्च सांगितल्याने अश्विनीसमोर डोंगरच कोसळला आहे. आपल्या संसाराचा विचार न करता आई- वडिलांची नि:स्वार्थी सेवा करणाऱ्या अश्विनीच्या मनाला उभारी देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.