शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

विभागात अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन साखर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:48 IST

कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर/सांगली) ३७ कारखान्यांनी हंगाम २०१७/१८ मध्ये उत्पादित केलेल्या साखरेपैकी तब्बल ५७ लाख ६२ हजार मे. टन साखर शिल्लक असून, आगामी साखर हंगाम तोंडावर असताना

ठळक मुद्देहंगाम तोंडावर : पुढील वर्षी गोडावून रिकामी करण्याचे अग्निदिव्य

कोपार्डे : कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर/सांगली) ३७ कारखान्यांनी हंगाम २०१७/१८ मध्ये उत्पादित केलेल्या साखरेपैकी तब्बल ५७ लाख ६२ हजार मे. टन साखर शिल्लक असून, आगामी साखर हंगाम तोंडावर असताना गोडावून कशी रिकामी करायची, असा प्रश्न आता कारखानदारांसमोर उभा राहिला आहे.

हंगाम २०१७/१८ मध्ये उसाचे प्रचंड उत्पादन झाल्याने साखर उत्पादनानेही उच्चांकी आकडा गाठला होता. या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी ४५ लाख २३ हजार ३७० मे. टन साखर उत्पादन झाले. तर सांगली जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी २५ लाख ४७ हजार ५९३ मे. टन साखर उत्पादन केले होते. तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांंकडे मागील हंगामातील (हंगाम २०१६/१७) १८ लाख ६१ हजार ७२६ मे. टन साखर शिल्लक होती.

२०१७/१८ चा हंगाम सुरू होताना साखरेचे दर ३४०० रुपये क्विंटल होता; पण हंगाम नोव्हेंबर २०१७ मध्ये साखरेच्या दरात घसरण सुरू झाली. हंगाम संपता संपता फेब्रुवारी २०१८ मध्ये साखरेचे दर २४०० रुपये प्रतिक्विंटलवर आले. यामुळे कारखानदारांनी साखर विक्रीला काढण्यासाठी हात आखडता घेतला. परिणामी, जानेवारी ते एप्रिल २०१८ मध्ये साखर विक्री ठप्प झाली होती. यामुळे साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आले. यावर केंद्र शासनाने साखर उद्योगाला दिलासा देणारे चार महत्त्वाचे निर्णय घेतले. यात ३० लाख टन बफर स्टॉक, साखर निर्यातीसाठी अनुदान व कारखानदारांना २९०० रुपयांपेक्षा कमी दरात विक्री करता येणार नाही. याचबरोबर साखर विक्रीसाठी दर महिन्याला ठराविक कोटाच शासन जाहीर केला असल्याने सध्या साखरेचे दर ३२०० ते ३३५० रुपयांपर्यंत स्थिरावले आहेत. आगामी सणासुदीच्या दिवसात साखरेच्या दरात मोठी वाढ होणार, असे संकेत मिळत आहेत. याच वाढणाऱ्या दराचा फायदा घेण्यासाठी कारखानदार इच्छुक आहेत. येत्या हंगामातही साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर या काळात साखरेचा खप चांगला झाला, तरच कारखानदारांना हंगाम २०१८/१९ मध्ये उत्पादित होणाºया साखरेला गोडावून उपलब्ध होणार आहे. अन्यथा, कारखानदार साखर साठवणुकीबरोबर आर्थिक आरिष्टात सापडणार आहेत.कारखान्यांकडे असलेला साखर साठाकोल्हापूर जिल्हावारणा - ९६५८०, भोगावती - ६५५३१, राजाराम बाबडा - ४८७११, शाहू कागल - ४५८१८, दत्त शिरोळ - ९८८१९, बिद्री - ४८६६८, गडहिंग्लज हरळी - २४०८९, जवाहर - १७०९९९, मंडलिक - ४२४३१, कुंभी-कासारी - ७७८६७, पंचगंगा इंचलकरंजी - ५७४१, शरद नरदे - ६०३०५, आजरा - २३६५७, उदय गायकवाड - १९६९९, डी. वाय. पाटील - २७६०४, गुरुदत्त टाकळी - ७०१९२, नलवडे शुगर - १८२२, हेमरस - ३३७५२, महाडिक शुगर - १०३१४, संताजी घोरपडे - ४०६६८, दत्त दालमिया - २५६६३, इंदिरा तांबाळे - २१२५६.सांगली जिल्हामानगंगा आटपाडी - ११२०९, किसन आहिर वाळवा- ६९३९६, रा. बा. पाटील साखराळे -१०४०९५.१, रा. बा. पाटील वाटेगाव - ३९३३७.४, रा. बा. पाटील कारंदवाडी -३६५१३.२, मोहन शिंदे - ३३५८८, विश्वास नाईक चिखली -४६८५२, क्रांती कुंडल - ७४१२२, सदगुरु राजेवाडी - ७२५१०, सोनहिरा वांगी - ८१३४९, महाकाली कवठेमहांकाळ - १०७६४, वसंतदादा सांगली - १३००५, उदगीर खानापूर - ४६७४८, केन अँग्रो - १७६३७, निनाईदेवी शिराळा - १०४२९.

सांगली जिल्हा मानगंगा आटपाडी - ११२०९, किसन आहिर वाळवा- ६९३९६, रा. बा. पाटील साखराळे -१०४०९५.१, रा. बा. पाटील वाटेगाव - ३९३३७.४, रा. बा. पाटील कारंदवाडी -३६५१३.२, मोहन शिंदे - ३३५८८, विश्वास नाईक चिखली -४६८५