शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आयशर टेम्पोखाली सापडून वहिफणी व्यावसायिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 15:18 IST

Accident Ichlkarnji Kolhapur : इचलकरंजी येथील डेक्कन मिल चौकात आयशर टेम्पोखाली सापडून मोपेडस्वार तरुण ठार झाला. नवनाथ राजाराम पोवार (वय ३५, रा. जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. तो वहिफणीचा व्यवसाय करीत होता. या अपघातात त्याचा मित्र गणेश रवींद्र परीट (२८, रा. कबनूर, ता.हातकणंगले) हा जखमी झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी बारा वाजता घडला.

ठळक मुद्देआयशर टेम्पोखाली सापडून वहिफणी व्यावसायिक ठारमुख्य मार्गावर घटना घडल्याने वाहतूक ठप्प

इचलकरंजी : येथील डेक्कन मिल चौकात आयशर टेम्पोखाली सापडून मोपेडस्वार तरुण ठार झाला. नवनाथ राजाराम पोवार (वय ३५, रा. जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. तो वहिफणीचा व्यवसाय करीत होता. या अपघातात त्याचा मित्र गणेश रवींद्र परीट (२८, रा. कबनूर, ता.हातकणंगले) हा जखमी झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी बारा वाजता घडला.घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नवनाथ हा मंगळवारी दुपारी नवनाथ व त्याचा मित्र गणेश हे दोघे मोपेड (एमएच ०९ ईडी ९१२७) वरून निघाले होते. त्याचवेळी पुणे येथील एका ट्रान्स्पोर्ट कंपनीचा आयशर टेम्पो (एमएच १२ एनएक्स ४१६४) डेक्कन चौकातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दिशेने येत होता.

त्यावेळी नवनाथ याच्या मोपेडच्या आडवे आलेल्या एकाला चुकविण्याच्या नादात मोपेड घसरून आयशर टेम्पोच्या चाकाखाली गेले. त्यामध्ये टेम्पोचे चाक नवनाथ याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला, तर गणेश हा जखमी झाला. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गणेशला खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जीवनमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह इंदिरा गांधी रुग्णालयात विच्छेदनासाठी नेला. पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त टेम्पो व चालक पांडुरंग भरत साठे (रा. खटाव, जि.सातारा) याला ताब्यात घेतले.

घटनास्थळी नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. नवनाथ हा इचलकरंजी भाजपा शहर उपाध्यक्ष राजाराम पोवार यांचा मुलगा आहे. नवनाथ याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे. मुख्य मार्गावर घटना घडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :Accidentअपघातichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर