शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या उमेदवारासाठी हाडाची काड अन् रक्ताचे पाणी करू - मंत्री हसन मुश्रीफ 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 29, 2024 15:44 IST

शाहू छत्रपतींनी राजकारणापासून अलिप्त रहावे अशी आमची इच्छा होती, पण..

कोल्हापूर : शाहू छत्रपती हे सर्वांचे आहेत. कोल्हापूरसाठी आदर्श आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारणापासून अलिप्त रहावे अशी आमची इच्छा होती. पण आता तेच राजकारणात येत आहेत यापुढे लोक ठरवतील अशी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. लोकसभेच्या रिंगणातील महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून यावेत यासाठी आम्ही हाडाची काड आणि रक्ताचे पाणी करू असेही ते म्हणाले. शाहू छत्रपती लोकसभा लढवण्याच्या चर्चांवर मंत्री मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हे लोकशाहीचे राज्य आहे शाहू छत्रपतींनी राजकारणात यावे की न यावे ही सर्वस्वी त्यांची इच्छा आहे. पण ते सर्वांचेच असल्याने त्यांनी राजकारण येऊ नये अशी आमची अपेक्षा होती.  2009 चे पुनरावृत्ती होणार का, मंडलिक विरुद्ध राजघराणे अशी लढत पुन्हा होणार आहे यावर मुश्रीफ म्हणाले, हा सर्वस्वी लोकांचा निर्णय आहे ते ठरवतील.शिंदे गटाच्या जागा तशाच मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी शिंदे यांच्या गटातील जागा तशाच ठेवाव्यात अशी चर्चा झाली होती. महायुतीतील तिन्ही पक्ष मिळून जे उमेदवार ठरवतील त्यांना निवडून आणू.

गुळगुळीत रस्ते बनवूकोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हाडांची दवाखाने  सुरू करा अशी टीका केली आहे यावर मुश्रीफ म्हणाले, शंभर कोटीच्या रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत, आणखी शंभर कोटीची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. आयआरबीच्या माध्यमातून 50 कोटींची रस्ते याआधीच झाले आहेत. त्यामुळे हाडांच्या दवाखान्याची गरज नाही आम्ही रस्तेच चांगले गुळगुळीत करू. सुळकूडबाबत आज बैठकमंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीवासियांना शुद्ध, स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे अशी  शासनाची आणि पालकमंत्री म्हणून माझीही इच्छा आहे. आज मुख्यमंत्र्यांसोबत  बैठकीसाठी सर्व नेत्यांना तसेच योजनेला विरोध करणाऱ्या व योजनेच्या बाजूने असलेल्या समितींना बोलवण्यात आले आहे. या बैठकीतच निर्णय होईल.कोल्हापुरी चप्पलाची बनावटगिरी रोखता येणारआज पर्यंत कोणतीही चप्पल कोल्हापुरी चप्पल म्हणून विकली जात होती पण आता चपलांमध्ये क्यूआर कोड बसवल्याने ही बनावटगिरी रोखता येणार आहे. अस्सल कोल्हापुरी चप्पल परदेशांमध्ये निर्यात केली जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाHasan Mushrifहसन मुश्रीफ