शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विधानपरिषदेची जोडणी; ‘गडहिंग्लज’करांना ताकद देण्यात नेत्यांची ‘चढाओढ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:28 IST

जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका

राम मगदूमगडहिंग्लज : जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका म्हणून गडहिंग्लजकडे पाहिले जाते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीचे गणित डोक्यात ठेवूनच येथील नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पक्ष-गटांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न नेहमी होतो. मात्र, जनता दलाचे ज्येष्ठ नेते ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या पश्चात होणाऱ्या निवडणुकीत गडहिंग्लजकरांना ‘ताकद’ देण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांत चढाओढ सुरू आहे.अपवाद वगळता तब्बल ४० वर्षे गडहिंग्लज नगरपालिकेवर ॲड. शिंदे यांचे वर्चस्व राहिले. शिंदेंच्या निधनानंतर त्यांच्याच विचाराने पुढील वाटचाल करण्याचा निर्णय त्यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी घेतला. मात्र, काही दिवसांतच जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.दरम्यान, राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांशी न जुळल्याने त्यांच्यात मतभेद झाले. त्याची उघड चर्चा होताच पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे बंधू अर्जुन आबीटकर यांनी खणगावे-भद्रापूर यांची भेट घेऊन ‘ताकद’ देण्याची ग्वाही दिली. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ यांनी जुन्या-नव्यांना आमने-सामने बसवून वादावर पडदा टाकला. त्यांच्यात दिलजमाई झाली असली तरी जिल्ह्यातील नेत्यांकडून गडहिंग्लजकरांना ‘ताकद’ देण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे.खणगावे-भद्रापूर यांनी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश करताच माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वाती कोरी यांची तातडीने भेट घेतली. त्यांनी जनता दलातच राहून वाटचाल केली तरी त्यांना ‘ताकद’ देण्याचा शब्द दिला. परिणामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’च्या प्रचारात कोरींनी आक्रमक पुढाकार घेतला. एव्हाना, त्यांनी विधानपरिषद गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांना जिल्ह्यात सर्वप्रथम पाठिंबा दिला होता.

‘रेडिमेड’ कार्यकर्त्यांवर डोळागडहिंग्लज शहरात जनता दल व राष्ट्रवादी हेच एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. भाजपा, काँग्रेस, उद्धवसेना, शरदचंद्र पवार पक्ष, शिंदेसेना, मनसे यांचा प्रभाव मर्यादित आहे. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक जनता दल व राष्ट्रवादी भोवतीच फिरणार आहे. म्हणूनच मंत्री आबीटकर यांच्यासह खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील ही मातब्बर मंडळी येथील ‘रेडिमेड’ कार्यकर्त्यांवर डोळा ठेवून आहेत.

शिंदे-कुपेकरांनी दाद दिली नव्हती !श्रीपतराव शिंदे यांच्या नगरपालिकेवरील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न बाबासाहेब कुपेकर यांनीही दोनदा केला होता. मात्र, दोघांनीही जिल्हा पातळीवरील नेत्यांना कधीच दाद दिली नव्हती. तवंदीघाटाच्या पलीकडील लोकांनी गडहिंग्लजमध्ये लुडबूड करू नये, असे कुपेकर म्हणायचे तर शिंदेंनी आयुष्यभर ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. त्यांच्या हयातीत जिल्ह्यातील नेत्यांनी गडहिंग्लज पालिकेच्या राजकारणात कधीही लक्ष घातले नव्हते. मात्र, दोघांच्या पश्चात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्यामुळेच जिल्ह्यातील नेत्यांकडून गडहिंग्लजकरांना ‘ताकद’ देण्याचा प्रयत्न सुरू आहे.