भेंडवडे, खोची येथील पूरग्रस्तांना जिल्हा परिषद सदस्य डॉ. अशोक माने यांच्या वतीने दिलेल्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अशोक माने म्हणाले, पूरग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आघाडीवर प्रयत्न केले जातील. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून पुनर्वसनासाठी सहकार्य केले जाईल. संकटात मदत करण्याची भूमिका ठेवून तालुक्यात साहित्य वाटप केले आहे. भेंडवडे येथील कार्यक्रमात सरपंच काकासो चव्हाण, उपसरपंच डॉ. संजय देसाई, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, माजी सभापती डॉ. प्रदीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, प्रदीप देशमुख, महेंद्र शिंदे, सुनील पसाले, सुहास देसाई, सुनील देसाई, विनोद देसाई, तर खोची येथे सरपंच जगदीश पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी-भेंडवडे येथे पूरग्रस्तांना साहित्य वाटपप्रसंगी आमदार विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण पाटील, डॉ.प्रदीप पाटील, अशोक माने, काकासाहेब चव्हाण, सुनील पसाले, उत्तम पाटील उपस्थित होते. (छाया-आयूब मुल्ला)