शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण तिसरी अन् आॅनलाईन गंडा २२ लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 13:51 IST

शिक्षण अवघे तिसरीपर्यंतचे अन् दिल्लीत बसून आॅनलाईनवरून कोल्हापूरच्या व्यापाऱ्यास २२ लाखांचा गंडा घातला. अशा बहाद्दरास लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिल्लीत जाऊन ताब्यात घेतले अन् रविवारी अटक केली. अजय गंगादास दास (वय २२, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. कर्जाचे आमिष दाखवून आॅनलाईनवरून विविध खात्यांवर पैसे टाकण्यास भाग पाडून संभाजीनगरातील गजानन भोसले (वय ६३) यांची ही फसवणूक झाली आहे, त्यांनीच लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देसंशयितास दिल्लीतून अटक : लक्ष्मीपुरी पोलिसांची कामगिरी कोल्हापुरातील व्यावसायिकाची फसवणूक

कोल्हापूर : शिक्षण अवघे तिसरीपर्यंतचे अन् दिल्लीत बसून आॅनलाईनवरून कोल्हापूरच्या व्यापाऱ्यास २२ लाखांचा गंडा घातला. अशा बहाद्दरास लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिल्लीत जाऊन ताब्यात घेतले अन् अटक केली. अजय गंगादास दास (वय २२, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. कर्जाचे आमिष दाखवून आॅनलाईनवरून विविध खात्यांवर पैसे टाकण्यास भाग पाडून संभाजीनगरातील गजानन भोसले (वय ६३) यांची ही फसवणूक झाली आहे, त्यांनीच लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, गजानन भोसले (वय ६३) हे प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना व्यवसायासाठी कर्जाची गरज होती. त्याबाबत आलेली जाहिरात वाचून त्यांनी सौभाग्य फायनान्स कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांना गोरख शर्मा नावाच्या व्यक्तीने प्रकल्प अहवाल पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना आठ कोटी ४० लाखांचे कर्ज मंजुरीचे पत्रही दिले.कर्जासाठी विविध प्रकारचे चार्जेस म्हणून १३ डिसेंबर २०१७ ते २ जुलै २०१८ कालावधीत तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यांवर २२ लाख ३७ हजार ९८० रुपये पाठविण्यास सांगितले. पैसे देऊनही कर्ज मंजूर होत नसल्याने भोसले यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली, त्यानंतर त्यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.

दरम्यान, गुन्ह्यातील संशयितांना दिल्लीत जाऊन शोधण्यासाठी प्रवास खर्च म्हणून भोसले यांच्याकडे २५ हजारांची लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचून संशयित हेड कॉन्स्टेबल अजिज शेख व चहा टपरीचालक दाऊद पाटणकर यांना दि. २४ जूनला पकडले होते.हॉटेलमध्ये वेटरचे कामआठवड्यापूर्वीच लक्ष्मीपुरीतील पथक दिल्लीला रवाना झाले. त्यांनी या प्रकरणातील संशयित अजय दास यास ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणले. रविवारी रात्री त्याला अटक केली. प्राथमिक तपासात तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता, तसेच त्याचे शिक्षण इयत्ता तिसरीपर्यंत झाले असल्याची माहिती पुढे आली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर