शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्र्यांना कोल्हापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही; अमर चव्हाण यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2023 20:00 IST

सरकारी शाळांसाठी गडहिंग्लजला मोर्चा, महिन्याचा अल्टीमेटम

गडहिंग्लज : वीस पटाखालील शाळा बंदचा निर्णय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महिन्याच्या आत मागे घ्यावा, अन्यथा त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा माजी सभापती अमर चव्हाण यांनी दिला.

सरकारी प्राथमिक शाळा बचाव समिती व डी.एड्.बी.एड्. बेरोजगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. लक्ष्मी चौकातून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता प्रांतकचेरीच्या आवारात झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.

जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, २० पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाचाच असतानाही शिक्षणमंत्री दुटप्पी भूमिका घेत आहेत. संबंधित अध्यादेश मागे न घेतलेस राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे म्हणाले, सरकारी शाळा वाचविण्यासाठी जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले, गोरगरीबांच्या शाळांसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. काँग्रेसचे दिग्विजय कुराडे म्हणाले, विशिष्ट विचारसरणीचे शिक्षक नेमण्यासाठीच शिक्षक भरती बंद आहे. सरकारी शाळांच्या खाजगीकरणाचाच हा डाव हाणून पाडला पाहिजे.

याप्रसंगी बसवराज आजरी, संतोष चिक्कोडे, सचिन देसाई, सुरेश थरकार, बाळासाहेब मोर्ती, रवींद्र यरकदावर यांचीही भाषणे झाली. मोर्चात मधुकर येसणे, सुभाष निकम, आण्णासाहेब शिरगावे, प्रशांत देसाई, संजय चाळक, अजित बंदी,अश्विन यादव, बसवराज आरबोळे, संजय सुतार, उज्वला दळवी, गीता पाटील,  आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.निवेदनातील मागण्या :

शिक्षणाचे खाजगीकरण थांबवा, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, डी.एड्., बी.एड्. बेरोजगारांना सेवेत सामावून घ्या, कंत्राटी शिक्षक भरती नको, शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरीत भरा.

यांनीही दिला पाठिंबा

गडहिंग्लज तालुका सरपंच संघटना आणि सखी महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही मोर्चात सहभागी होवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

शेतमजूर महिलेचा इशारा

मराठी शाळा बंद केल्या तर गरीब मुलं कुठे जातील. आई-बाप नसलेल्या मुलांनी कसं शिकायचं? आमची मागणी मान्य झाल्याशिवाय इथून हलणार नाही ? या शब्दांत खणदाळच्या सुनंदा धनवडे या शेतमजूर महिलेने आपली संतप्त भावना व्यक्त केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर