शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेल, तिळाचे दर वधारले, भाजीपाला, फळांमध्ये मात्र स्वस्ताई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:55 IST

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फळे, भाजीपाल्याने बाजार फुलला आहे. आवक वाढल्याने दर घसरल्याने बाजारात स्वस्ताईचा माहौल आहे; पण याच वेळी रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलाचे दर मात्र गगनाला भिडत असल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देखाद्यतेल, तिळाचे दर वधारले, भाजीपाला, फळांमध्ये मात्र स्वस्ताईसंक्रांतीच्या तोंडावर बाजार फुलला

कोल्हापूर : संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फळे, भाजीपाल्याने बाजार फुलला आहे. आवक वाढल्याने दर घसरल्याने बाजारात स्वस्ताईचा माहौल आहे; पण याच वेळी रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलाचे दर मात्र गगनाला भिडत असल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडण्याची वेळ आली आहे.

शेंगतेल प्रतिकिलो दीडशेकडे कूच करीत असून सरकी, सूर्यफूल या तेलांनीदेखील शंभरी पार केली आहे. अतिवृष्टीमुळे तिळाचे पीक वाया गेल्याचा परिणाम बाजारात दिसत असून, ऐन संक्रांतीला तिळाचा गोडवा महागाईने कडवटपणात बदलला आहे. १०० रुपये किलो असणारा तीळ आता १५० च्याही वर गेला आहे. गूळही ५० ते ५५ रुपयांवर गेला आहे.रविवारी लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारात फेरफटका मारला असता हरतऱ्हेच्या भाज्या आणि फळांनी बाजार ओसंडून गच्च भरल्यासारखी परिस्थिती आहे. गवारी आणि भेंडीचे दर केवळ ५० ते ६० रुपये किलो आहेत; अन्यथा सर्वच फळभाज्या २० ते ३० रुपये प्रतिकिलोने विकल्या जात आहेत.

कोबी आणि फ्लॉवरची आवक प्रचंड झाल्याने दरही १० ते १५ रुपये गड्डा असा झाला आहे. काकडी आणि गाजरांचे ढीग वाढू लागले आहेत. त्यांचा दरही २० ते ४० रुपये किलो आहे. कोथिंबिरीसह पालेभाज्या १० रुपयांना जुडी असा दर आहे.लहान-मोठ्या आकारांचे तिळगूळ १०० रुपये, तीळवडी व रेवड्या २०० रुपये किलो असा दर झाला आहे. पूजनासाठी लागणारी सुगडीही ५० रुपयांना अर्धा डझन आहेत.

नवीन कांदा-बटाट्याची आवक वाढलीबाजारात नवीन कांदा व बटाट्यांची आवक वाढली आहे. जुना कांदा व बटाटा ४०, तर नवीन ३० रुपये किलो असा दर आहे. आलेही ८० ते ९० रुपये किलोवर आले आहे. लसूण अजूनही १५० रुपयांवर स्थिर आहे. टोमॅटोचे दर १५ रुपये किलो झाले आहेत.संक्रांतीला प्रामुख्याने लागणारा आणि फक्त हिवाळ्यातच खायला मिळणारा ओला हरभरा बाजारात आला आहे. १० रुपयांना दोन डहाळे असा दर आहे.डाळिंबांचे दर घसरलेबाजारात सांगोल्याहून येणारे अ‍ॅपल बोर आणि गणेश डाळिंबांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. २० रुपये किलो असा दर आहे. याशिवाय संत्र्यासारख्या दिसणाऱ्या माल्टाचीही आवक मोठी आहे. ४० ते ५० रुपये असा किलोचा दर आहे.बाजारात सहसा दृष्टीस न पडणारे अंजीर आता मात्र मुबलक प्रमाणात दिसत असल्याने दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. ५० ते ६० रुपये असा किलोचा दर आहे. पपई १० रुपयांना एक नग आहे. सफरचंद ८० ते १२० रुपये किलो आहेत. द्राक्षांचे दरही कमी होऊ लागले आहेत. ५० रुपयांना अर्धा किलो असा दर आहे.डाळींचे दरतूर ९६, उडीद १२०, मसूर ७०, हरभरा ७०, मूग ९६, मसूरा ७०, चवळी ८०, हरभरा ८०, मटकी १२०, मूग ८४ रु. प्रतिकिलो. दर आहेत.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर