शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

ई वॉर्डातील पाणीप्रश्नी आयुक्तांची पाच तास पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:23 IST

शिंगणापूर थेट पाईपलाईन झाली, कसबा बावडा ते ताराराणी चौकापर्यंत नवीन जलवाहिनी टाकली, तरी ई वॉर्ड परिसरास पाणी पुरवठा होत नसल्यामुळे त्याची कारणे काय आहेत, हे प्रत्यक्ष जाणून घेण्याकरिता महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकतीच शिंगणापूर ते ताराराणी चौकपर्यंतची पाणी वितरण ठिकाणांची पाहणी केली.

ठळक मुद्देई वॉर्डातील पाणीप्रश्नी आयुक्तांची पाच तास पाहणीपाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा : कलशेट्टी

कोल्हापूर : शिंगणापूर थेट पाईपलाईन झाली, कसबा बावडा ते ताराराणी चौकापर्यंत नवीन जलवाहिनी टाकली, तरी ई वॉर्ड परिसरास पाणी पुरवठा होत नसल्यामुळे त्याची कारणे काय आहेत, हे प्रत्यक्ष जाणून घेण्याकरिता महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकतीच शिंगणापूर ते ताराराणी चौकपर्यंतची पाणी वितरण ठिकाणांची पाहणी केली.गेल्याच आठवड्यात भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची भेट घेऊन ई वॉर्डातील पाण्याचा प्रश्न बिकट असल्याची माहिती दिली होती. तसेच किमान दोन तास तरी सर्वांना समान पाणी द्यावे, त्याचबरोबर आपणही प्रत्यक्ष फिरती करून पाणी वाटपाचे नियोजन करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी शनिवारी ही पाहणी केली.शहराच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या ई वॉर्डला कमी दाबाने पाणी पुरवठा का होतो, याची माहिती घेण्याकरिता आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी करताना, दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत शिंगणापूर जॅकवेल, बटुकेश्वर बॅक प्रेशर टँक, आपटेनगर पाण्याची टाकी, नवीन आपटेनगर संप अ‍ॅन्ड पंप हाऊस, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्र, साळोखेनगर टाकी, कळंबा संप अ‍ॅन्ड पंप हाऊस, कळंबा फिल्टर हाऊस, जरगनगर टाकी, सुभाषनगर पंपिंग स्टेशन, शेंडापार्क टाकी, राजेंद्रनगर टाकी, राजारामपुरी टाकी व पंपिंग स्टेशन, राजारामपुरी मेन लाईनवरील व्हॉल्व्ह व कावळा नाका टाकी या विविध ठिकाणी भेट देऊन, वितरण व्यवस्थेची पाहणी केली.यावेळी शहरातील विविध भागांत वितरित होत असलेल्या पाणी पुरवठ्याची माहिती त्यांनी घेतली. तसेच सर्व प्रभागांत पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना दिल्या. यावेळी उपजलअभियंता रामदास गायकवाड, शाखाअभियंता अक्षय आटकर, अभिलाशा दळवी, गुंजन भारंबे, राजेंद्र हुजरे, मिलिंद पाटील, आदी उपस्थित होते.

पहिल्यांदाच आयुक्तांची फिरतीयापूर्वी अनेकवेळा ई वॉर्डातील पाणी पुरवठ्याबद्दल तक्रारी झाल्या. नागरिकांनी आंदोलने केली. नगरसेवकांनी महासभेत अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले; परंतु कोणाही आयुक्तांना हा प्रश्न नेमका काय आहे, याची माहिती घेण्याची तसदी घेतली. अधिकाऱ्यांनाच आदेश देऊन मोकळे झाले; परंतु डॉ. कलशेट्टी यांनी मात्र प्रथमच इतक्यात दीर्घ पल्ल्याचा प्रवास करीत, पाणी वितरणाची माहिती करून घेतली.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीkolhapurकोल्हापूर