शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

शाहू महाराजांच्या काळात होत्या चित्त्यांच्या वसाहती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:39 IST

कोल्हापुरात संस्थानात होते ३५ चित्ते; विक्रम हायस्कूलजवळ अजूनही चित्तेखाना, शहर परिसरात राहतात चित्तेवान

- संदीप आडनाईककोल्हापूर : भारतातून चित्ता आज नामशेष झाला असला तरी पूर्वी उत्तर आणि दक्षिण भारतातील संस्थानांमध्ये चित्ता पाळला जायचा. इतकेच नव्हे तर केवळ काळविटाची शिकार करण्यासाठी त्यांना माणसाळविले जायचे. त्यासाठी कोल्हापूर संस्थानात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी चित्त्यांच्या वसाहती स्थापन केल्या होत्या. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील विक्रम हायस्कूलजवळ अजूनही चित्तेखाना (चित्ता कारखाना) पाहायला मिळतो.आफ्रिकन चित्त्याचे भारतात पुनर्वसन करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने २८ जानेवारी २०२० रोजी हिरवा कंदील दिल्यामुळे भारतातून नामशेष झालेल्या या वेगवान प्राण्याची डरकाळी पुन्हा घुमणार आहे. चित्ता हा (अ‍ॅसिनोनिक्स जुबेटस) मांसाहारी वन्य प्राणी असला तरी बिबट्या आणि चित्ता यांच्यात मूलभूत फरक आहे. बिबट्या रात्री शिकार करतो, तर चित्ता दिवसा. तो भित्रा पण प्रामाणिक प्राणी आहे; त्यामुळेच त्याचा शिकारीसाठी उपयोग करुन घेतला जात असे. उत्तर भारतात जयपूर, घोलपूर, भरतपूर, दक्षिणेत हैदराबाद, म्हैसूर, कोल्हापूर, जमखंडी, मुधोळ, फलटण, गुजरातमध्ये भावनगर, बडोदा या संस्थानांमध्ये चित्ते पाळून त्यांच्याकडून शिकार करवून घेतली जात होती. त्यात कोल्हापूर संस्थानाचा उल्लेख सर्वांत वरचा होता. संस्थानात ३५ चित्ते होते. याची नोंद टॅक्सीडर्मिस्ट बोथा व्हॅन इनगेन यांनी ठेवली आहे. त्यांनी १९३६ मध्ये कोल्हापूरला भेट दिली होती. वीरमती, लक्ष्मी, गणप्या, स्टार, भवानीशंकर अशी चित्त्यांची नावे होती, अशी माहिती गणेश नेर्लेकर-देसाई यांनी शिकारी चित्ता आणि चित्तेवान पुस्तकात नमूद केली आहे.विद्यार्थिदशेत राजकोट येथे शिक्षण घेत असताना शाहू महाराजांनी त्यांचे सहाध्यायी भावनगरचे राजे भाऊसिंहजी महाराज यांच्याकडे भावनगर येथे चित्त्यांकडून केलेली शिकार पाहिली आणि त्यांनी कोल्हापूर संस्थानात चित्त्यांची शिकार सुरू केली. त्यासाठी कोल्हापुरातील लोकांना आफ्रिकेत पाठवून शिकारीचे प्रशिक्षण दिले. अशा शिकारी छत्रपती राजाराम महाराज यांच्यापर्यंत १९४० पर्यंत जपल्या गेल्या. १९४० पर्यंत हे रॉयल स्पोर्ट जपणारे कोल्हापूर हे एकमेव संस्थान होते, अशी माहिती लीलावती दौलतराव जाधव यांनी लिहिलेल्या ‘शिकारी चित्ता आणि चित्तेवान’ या पुस्तकात नमूद आहे.संस्थानात बालेखाँ चित्तेवान, सरदारखाँ चित्तेवान, चॉँदसाहेब जमादार, इस्माईल रहिमान जमादार, धोंडी लिंबाजी पाटील, येकू बाळा घोरपडे, हनीफ बालेखाँ जमादार, बाबूलाल उस्मान चित्तेवान, तुकाराम चेद्राप्पा बोडके, मोहीद्दीन बाबाजी शेख, बडे भाई, हुसेन रहिमान जमादार, आबालाल मीरा फकीर, नारू शंकर मांग, कमाल अब्दुल चित्तेवान, बिरू रामा धनगर, नुरुल्लाखान हुसेनखान पठाण असे चित्तेवान होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर