शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दिलबहार, पाटाकडील तालमीच्या ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 11:45 IST

कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामना संपल्यानंतर मैदानातील वाद उफाळून हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत स्टेडियमवरील लाईटच्या वायर, रस्त्याकडेला उभी असलेली वाहने, चहाटपरी आदींची मोडतोड केली होती. याप्रकरणी दिलबहार आणि पाटाकडील तालमीच्या ३० कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चौघांना सोमवारी अटक केली.

ठळक मुद्देदिलबहार, पाटाकडील तालमीच्या ३० कार्यकर्त्यांवर गुन्हाचौघांना अटक, अन्य संशयितांची धरपकड सुरू

कोल्हापूर : येथील छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामना संपल्यानंतर मैदानातील वाद उफाळून हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत स्टेडियमवरील लाईटच्या वायर, रस्त्याकडेला उभी असलेली वाहने, चहाटपरी आदींची मोडतोड केली होती. याप्रकरणी दिलबहार आणि पाटाकडील तालमीच्या ३० कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चौघांना सोमवारी अटक केली.संशयित अनिकेत अनंत सावंत (वय २३), आशिष जोतीराम जमदाडे (२८), स्वप्निल विनायक माने (२५, तिघे, रा. रविवार पेठ, कोल्हापूर), इचिबेरी युझुची इमॅन्युअल ऊर्फ चिमा (२९, रा. मूळ नायजेरियन, सध्या सणगर गल्ली, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. अन्य संशयित नीलेश जाधव, धनाजी सूर्यवंशी, शशांक माने, अक्षय फाळके, शैलेश माने, महेश पाटील, अजय शिराळे, बंटी कावणेकर, धीरज बालगुडे आदींची धरपकड सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.गेले काही दिवस येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर श्री बालगोपाल तालीम मंडळाच्यावतीने चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू होत्या. रविवारी पाटाकडील तालीम आणि दिलबहार तालीम यांच्यात अंतिम सामना चुरशीचा झाला; पण मैदानातील खेळाडूंतील इर्र्ष्येपेक्षा दोन्ही संघांतील समर्थकांत असभ्य भाषेत वक्तव्ये करत निर्माण झालेली इर्ष्या शिगेला पोहोचली. सामना संपल्यानंतर दोन्ही तालमीच्या कार्यकर्त्यांच्यात राडा झाला.

यावेळी रस्त्याकडेच्या वाहनांना लक्ष्य करत तोडफोड केली. यावेळी दगड भिरकावल्याने भारत राखीव बटालियनचा पोलीस कर्मचारी विकास शंकरराव हिवाळे, कमलेश भगवानभाई मारडिया (रा. रूईकर कॉलनी), विशाल सुनील जाधव (रा. आझाद गल्ली) हे तिघेजण जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून रविवारी रात्री उशिरा सार्वजनिक मालमत्ता नुकसान व इलेक्ट्रिक अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बाजीराव पाटील यांनी फिर्याद दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण तपास करत आहेत. 

 

टॅग्स :FootballफुटबॉलCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर