शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकमुळे दूध पावडरचे दर आठ दिवसांत २५ रुपयांनी वाढले; दूध संघांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:23 IST

milk powder : कोरोनामुळे सर्वच घटकांवर कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, मोठे लग्न समारंभ हे बंद असल्याने दुधाच्या मागणीवर परिणाम झाला आहे.

- राजाराम लोंढे

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे देशांतर्गत दूधदूध पावडरची मागणी कमालीची घटल्याने दरात मोठी घसरण झाली होती. मात्र राज्यासह देशात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दूध पावडरच्या दरात आठ दिवसात किलो मागे २५ रुपयांची वाढ झाली आहे. मात्र अद्याप किलोमागे ३० ते ४० रुपयांचा फटका दूध संघांना बसत आहे.

कोरोनामुळे सर्वच घटकांवर कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, मोठे लग्न समारंभ हे बंद असल्याने दुधाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर तीन-चार महिने काहीसे सुरळीत झाले होते. मात्र मार्चपासून पुन्हा दुसऱ्या लाटेमुळे सगळे ठप्प झाले. दूध हे जीवनाश्यक असल्याने त्याची खरेदी-विक्री सुरू राहिली. मात्र हॉटेल, मोठे समारंभ बंद राहिल्याने गेली तीन महिने दूध अतिरिक्त होत आहे. विशेषत: गाय दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत आहे.

अतिरिक्त दुधापासून पावडर तयार केली जात असून देशात २ लाख टन तर राज्यात ४० हजार टन पावडर पडून आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत पावडरच्या दरात मोठी घसरण झाली. गाय दूध पावडर १८० रुपये किलो तर बटर २५० रुपये किलोपर्यंत खाली आले होते. आता पावडर २०५ तर बटर २६० रुपये किलो आहे.

दूध खरेदी दरात कपात केल्याने शेतकरी हवालदिलपावडरच्या दरात घसरण झाल्याने राज्यातील खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात केली होती. कोल्हापूर व सांगली जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यातील बहुतांशी दूध संघ २० ते २२ रुपये लिटरने दूध खरेदी करत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पावडर निर्यातीसाठी अनुदानाची गरजआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियातील दूध पावडर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथे २२० रुपये किलो दर आहे. परदेशात निर्यात करायची म्हटले तर देशनिहाय वेगवेगळा खर्च येतो. येथील दूध खरेदी, पावडर प्रक्रियेसह निर्यातीसाठी येणारा खर्च पाहता किमान किलोमागे १५ ते २० रुपये अनुदानाची मागणी होत आहे.

टॅग्स :milkदूध