शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: घरावर ड्रोन, टेहाळणी करतंय कोण?; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण, पोलिसांनी मागवली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 15:43 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात टोप, दानोळी, नरंदे, शिरोली, पडळसह काही ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत. अचानक सुरू ...

कोल्हापूर : जिल्ह्यात टोप, दानोळी, नरंदे, शिरोली, पडळसह काही ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत. अचानक सुरू असलेल्या या ड्रोनच्या घिरट्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रभारी अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. सरकारी काम, खासगी ड्रोन की चोरट्यांच्या शोधासाठी कोणी ड्रोन उडवत आहेत का? याची माहिती घेतली जात आहे. येत्या दोन दिवसात या प्रकाराची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.जिल्ह्यात सध्या रात्रीच्या अंधारात भिरभिरणाऱ्या ड्रोनमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरी होत असल्याच्या अफवा असल्याने काही गावांत तरुणांनी गस्तही सुरू केली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी, सरकारी कामासाठी काही ठिकाणी माहिती घेतली जात आहे का, काही ठिकाणी खासगी ड्रोन उडवले जात आहेत का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सर्वसामान्यांच्या तसेच सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचवू शकणारी ड्रोन सर्वत्र भिरभिरताना दिसत आहेत. ड्रोन उडविण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस आणि महापालिकेचा परवाना सक्तीचा आहे.

ड्रोन वापरायचा नियमड्रोन वापरण्यासाठी प्रशिक्षण अत्यावश्यक असून, पुणे आणि दिल्ली येथे ते तंत्रशुद्धपणे दिले जाते. ड्रोनचे वजन, त्यामुळे होणारे अपघात, रहिवासी इमारतींवर उडविण्यासाठी आवश्यक उंची याविषयी अनेक नियम पाळावे लागतात. ड्रोनचा वापर थेट राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील भागात ड्रोन उडविण्यावर निर्बंध आहेत. पोलिस, प्रशासनाची कार्यालये, विमानतळ, महत्त्वाची रुग्णालये, प्रयोगशाळा, संरक्षणविषयक संस्था, समुद्रकिनारे आदी ठिकाणी ड्रोन उडवता येत नाही. ते उडविण्यासाठी प्रशिक्षित, प्रमाणपत्रधारक कर्मचारी आवश्यक आहे.

घरातील सोने चाचपणीसाठी ?रात्रीच्या वेळी घरावर फिरणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून घरात सोने किती आहे, याची चाचपणी केली जात आहे, अशी अफवाही रहिवाशांच्यात आहे. ड्रोनच्या माध्यमातून रेकी करून चोरी केली जात असल्याचा संशयही रहिवाशांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकाराने काहीजण संध्याकाळी सात वाजताच घरातील दिवे बंद करून झोपत असल्याची ग्रामीण भागात स्थिती आहे.

रात्री उडवल्या जाणाऱ्या ड्रोनची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. प्रभारी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल. ड्रोन आकाशात दिसल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

टॅग्स :kolhapurकोल्हापूर