शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुऱ्हाळघर म्हणजे ‘लग्नाचा खर्च गोंधळावर’, गुळाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 17:38 IST

कारखान्यांमधील दराची स्पर्धाही कारणीभूत

राजाराम लोंढेकोल्हापूर : गुळाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख आहे. मात्र अस्थिर दर, मजुरांची वानवा आणि इतर जिल्ह्यातील गुळाच्या अतिक्रमणामुळे येथील व्यवसाय अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या पटीत दर मिळत नाही, ‘गुऱ्हाळघर म्हणजे लग्नाचा खर्च गोंधळावर’ असाच प्रकार असल्याने यंदा अनेकांनी गुऱ्हाळघरे बंद ठेवली आहेत.‘कोल्हापुरी गुळाने साता समुद्रापार भुरळ पाडली आहे. येथे मोठ्या प्रमाणात गुळाची निर्मिती व्हायची, मात्र गेल्या पंधरा-वीस वर्षांत साखर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि शेतकरी त्याकडे वळला. काही तालुक्यांत गुऱ्हाळघरे तरीही तग धरून होती. मात्र उसाचा दर कायद्याच्या चाकोऱ्यात आला आणि शेतकऱ्यांना कारखान्याकडील पैशाची हमी मिळाली आणि गुऱ्हाळघरांच्या चिमण्या हळूहळू कमी होत गेल्या.गेल्या तीन-चार वर्षांत उसाचा दर सरासरी तीन हजारांपर्यंत राहिला. त्या तुलनेत गुळाला भाव मिळत नसल्याचा परिणाम गूळनिर्मितीवर दिसत आहे. कोल्हापूर बाजार समितीत तुलनात्मक पाहिले तर स्थानिक गुळाची आवक वर्षाला कमी होत चालली आहे. मात्र बाहेरील गुळाची आवक वाढत आहे.

कारखान्यांमधील दराची स्पर्धाही कारणीभूतजिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस दराची स्पर्धा सुरू आहे. त्यातून उसाची पळवापळवी होते, त्यात यंदा कारखान्यांचा ऊस दर सरासरी तीन हजार प्रतिटन असल्याने शेतकऱ्यांचा गुऱ्हाळघरांकडील ओढा कमी झाला आहे.

उत्पादन खर्च दुप्पट, दर तेवढाचगेल्या चार वर्षांत घाऊक बाजारात गुळाचा दर जवळपास स्थिर राहिला आहे. दर प्रतिक्विंटल ३२०० ते ४४९० रुपयांपर्यंत राहिला आहे. मात्र गुळाचा उत्पादन खर्च दुप्पट झाल्याने हा व्यवसाय खऱ्या अर्थाने आतबट्ट्यात आला आहे.

तुलनात्मक कोल्हापूर बाजार समितीतील गुळाचा दर, प्रतिक्विंटलवर्ष     - आवक रवे  - किमान   - कमाल दर२०२०  - १७,२४२   - ३१०९   -  ४४९०२०२१ - १८,४१५   -   ३२०५   - ४३७०२०२२ - २०,२३०   -  २७००    - ४३२०२०२३ - १७,१७०  -  ३५००     - ४१९०

गुळाचा कमाल दर ४ हजारांच्या वर दिसतो, मात्र तो किती शेतकऱ्यांना मिळतो, हेही महत्त्वाचे आहे. सरासरी ३५०० रुपये दर मिळतो, त्यातच गूळ व्यवसायाबाबत शासन उदासीन असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. - शिवाजी पाटील (गूळ उत्पादक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर