शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप: ..अन्यथा निवडणुकीत हिसका दाखवू, शासकीय कर्मचाऱ्यांचा सज्जड इशारा 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 14, 2023 17:02 IST

काेल्हापूर : जुन्या पेन्शनबाबत बुधवारी रात्री राज्य सरकारबरोबर बोलणी फिस्कटल्यानंतर राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत ...

काेल्हापूर : जुन्या पेन्शनबाबत बुधवारी रात्री राज्य सरकारबरोबर बोलणी फिस्कटल्यानंतर राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संपास्त्र उगारले. कोल्हापुरातील टाऊन येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या कर्मचारी शिक्षकांनी जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा असा नारा देत मागणी मान्य न झाल्यास निवडणुकीत हिसका दाखवू असा सज्जड इशारा दिला. संपामुळे शासकीय कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट होता. कंत्राटी कामगार वगळता कार्यालयात कर्मचारी नसल्याने कामकाज ठप्प झाले होते. सन २००५ नंतर भरती झालेल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनादेखील जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. २६ नोव्हेंबरला बेमुदत संपाचे पत्र दिले २ डिसेंबरला सहकुटूंब मोर्चा काढल्यानंतरही शासनाने कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्याक़डे दुर्लक्ष केले मात्र संप होणार हे लक्षात आल्यानंतर बुधवारी सायंकाळी कर्मचारी व शिक्षक संघटनांना चर्चेसाठी बोलावण्यात आले मात्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा फिसकटली, त्यामुळे कर्मचारी व शिक्षकांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू करण्याचा निर्णय कायम ठेवला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलनGovernmentसरकारStrikeसंप