शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारी वाढल्या; कोल्हापूर पोलिस अधीक्षकांनी वाहतूक शाखेचे दफ्तर केलं जप्त

By उद्धव गोडसे | Updated: February 8, 2024 12:28 IST

वसुलीचा ताण वाढल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

कोल्हापूर : शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेची पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कानउघडणी केली. स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन अधीक्षक पंडित यांनी पोलिसांचे दफ्तर जप्त केले. या कारवाईनंतर दंड वसुलीचा ताण वाढल्यामुळे पोलिसांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.पोलिस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांमधील घडामोडींवर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे बारकाईने लक्ष असते. दैनंदिन कामकाजात काही उणिवा लक्षात येताच ते संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलवून घेऊन समज देतात. यामुळे त्यांच्या कार्यशैलीचा पोलिसांमध्ये धाक आहे.सोमवारी (दि. ५) सायंकाळी ते स्वत:च अचानक शहर वाहतूक नियंत्रण शाखेत पोहोचले. उपस्थित असलेले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. रोज किती वाहनांवर दंडात्मक कारवाया होतात? किती दंड वसूल होतो? पावत्या आणि दंडाची रक्कम यांचा ताळमेळ आहे काय? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून त्यांनी कर्मचाऱ्यांची झडती घेतली. कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने अखेर त्यांनी पोलिस ठाण्यातील दफ्तर, दंडाची पावती पुस्तके जप्त करून कर्मचाऱ्यांना खुलासा करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.चौकशीनंतर मंगळवारी दफ्तर आणि पावती पुस्तके परत दिली. मात्र, नागरिकांच्या तक्रारी वाढू नयेत, याबद्दल खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. अधीक्षक पंडित यांनी अचानक येऊन केलेल्या कारवाईमुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेत खळबळ उडाली.तक्रारी वाढल्याशहर वाहतूक नियंत्रण शाखेतील बिट मार्शल आणि सिग्नलवर थांबणारे वाहतूक पोलिस वाहनधारकांवर दंडात्मक कारवाया करतात. अनेकदा जिल्ह्याबाहेरून येणारी वाहने पोलिसांकडून लक्ष्य केली जातात. सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी थांबून वसुली केली जाते. दंडाच्या रकमा मोठ्या असल्यामुळे दोनशे-तीनशे रुपयांत तडजोड केली जाते. दंड वसुली आणि प्रत्यक्ष कारवाया यात ताळमेळ नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेची झडती घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtraffic policeवाहतूक पोलीस