शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दसऱ्याच्या मुहूर्तांवर अर्थचक्राला मिळाली गती, ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींचे सीमोल्लंघन

By संदीप आडनाईक | Updated: October 7, 2022 17:53 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा बाजार ठप्प झाला होता

संदीप आडनाईककोल्हापूर : दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे म्हटले जाते, याची प्रचीती दोन वर्षांनंतर यंदा बाजारपेठेत दिसून आली. यंदा बाजारात प्रचंड उत्साह होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा बाजार ठप्प झाला होता. यंदा मात्र, अर्थचक्राला गती मिळाल्याचे दिसून आले.साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या सणाला दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या विक्रीने सीमोल्लंघन केले आहे. यापूर्वीच्या विक्रीच्या तुलनेत यंदा दुचाकी विक्रीने चार कोटींचा, तर चारचाकीच्या विक्रीत दोनशे कोटी रुपयांचा उच्चांक गाठल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची सरासरी पन्नास टक्के इतकी विक्रमी विक्री झाल्याने अर्थचक्राला मोठी गती मिळाली.एकाच दिवशी १८५० दुचाकींची विक्रीशहरातील वेगवेगळ्या विक्रेत्यांकडे सुमारे १८५० पेट्रोलवरील दुचाकींची विक्री झाली. यामध्ये युनिक ऑटोमोबाइलमध्ये ४५०, पॉप्युलर ऑटो येथे ३५०, माय ह्युंदाईमध्ये १०५० दुचाकींची विक्री झाली.१२२० चारचाकींची विक्रीदसऱ्याच्या मुहूर्तावर शहरातील विक्रेत्यांकडे सुमारे १२२० चारचाकी वाहनांचीही विक्री झाली आहे. यामध्ये महिंद्राच्या चारचाकी कार आणि मालवाहतूक अशा २००, युनिक ऑटोमोबाइलमध्ये ३६०, माय ह्युंदाईमध्ये १७५, साई सर्व्हिसमध्ये २५०, चेतन मोटर्समध्ये १३५, भारत निसानमध्ये ४०, सोनक टोयोटामध्ये ६० चारचाकी गाड्यांची विक्री झाली आहे. अनेक ग्राहकांनी महिनाभर आधीपासूनच मोटारसायकलचे बुकिंग करून ठेवलेले होते. त्यांच्याशिवाय विक्रेत्यांनी दसऱ्याला ऐनवेळी येणाऱ्या ग्राहकांनाही नाराज न करता मोटारसायकल देण्यात आली.चारचाकीसाठी सहा-सहा महिने वेटिंगदसऱ्याच्या मुहूर्तावर जरी वाहनांची विक्री झाली असली तरी यातील काही आलिशान गाड्यांसाठी ग्राहकांना सहा महिने वेटिंग करावे लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महिंद्रा, मारुती सुझुकी, ह्युदाई, फोक्सवॅगन, रेनाॅल्ट, एमजी, टाटा, स्कोडा, निसान, टोयोटा अशा चारचाकी आलिशान गाड्यांची आणि मालवाहतूक गाड्यांना प्रचंड मागणी असून त्यासाठी ग्राहक प्रतीक्षा करण्यासही तयार आहेत.

इलेक्ट्रिक वाहनेही जोरातपेट्रोलवरील दुचाकीप्रमाणेच इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही जोरात आहे. दसऱ्याच्या दिवशीच या इलेक्ट्रिक गाडीला मोठी मागणी होती. यंदा ३५० हून अधिक इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली आहे. तुलनाच करायची झाली तर बाजारपेठेत साठ, चाळीस असा व्यवहार इलेक्ट्रिक गाड्यांनी केला आहे. सुमारे अडीच कोटींचा व्यवसाय या गाड्यांनी केला आहे.

दसऱ्याच्या दिवशी मोटारसायकल खरेदी करण्याकडे सर्वांचा जास्त कल असतो. बाजारपेठेत सर्व नामांकित मोटारसायकल कंपन्यांची शोरूमद्वारे ही विक्री होत असते. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीपेक्षा यंदा मोटारसायकलची विक्री जोरात होती. दसऱ्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुचाकीत मात्र पेट्रोल गाड्यांना इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा थोडासा कमी प्रतिसाद दिसत होता.  -तेज घाटगे, घाटगे ग्रुप, कोल्हापूर. 

यंदा दसऱ्याला बाजारपेठेत ग्राहकांचा कमालीचा उत्साह दिसून आला. चारचाकीला यावेळी मोठी मागणी मिळाली. अनेकांना वेटिंगवर ठेवावे लागले. यंदा सरासरी ३० टक्के वाढ दिसून आली. -उदय लोखंडे, ट्रेन्डी व्हिल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDasaraदसरा