शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Kolhapur: लाडक्या बहिणींच्या अनुदानाचा ४५२ कोटींचा बोजा, योजना सुरू राहिली तर..

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 11, 2024 13:43 IST

पैसेवाल्या सुटल्या, गरीब अडकल्या..

इंदुमती गणेशकोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील १० लाख ६ हजार ३११ महिला लाभार्थींमुळे गेल्या तीन महिन्यांत शासनाच्या तिजोरीवर तब्बल ४५२ कोटी ८३ लाख ९९ हजार ५०० इतक्या रकमेचा बोजा पडला आहे. योजना अशीच सुरू राहिली तर फक्त जिल्ह्यात वर्षाला १८११ कोटी ३५ लाख ९८ हजार रुपयांचे अनुदान लागणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत ठणठणाट होऊन त्याचा भार शेवटी सर्वसामान्य नागरिकांवरच पडणार आहे.राज्यात जुलैमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली. तेव्हापासून गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातून १० लाख २२ हजार ४१ अर्ज आले आहेत. त्यापैकी १० लाख ६ हजार अर्जांना मंजुरी मिळाली आहे. सुमारे नव्वद टक्के महिलांच्या खात्यावर तीन महिन्यांचे ४५०० रुपये जमा झाले आहेत. ज्या १ लाख ११ हजार महिलांचे बँक खाते आधारसोबत लिंक झालेले नाही त्यांची यादी महिला व बालकल्याण विभागाने गावनिहाय यादी पाठवून या महिलांचे आधार लिंकिंग करायला लावले आहे.या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीत शब्दश: ठणठणाट होत असून त्याचा भार पुन्हा करदात्या व सर्वसामान्य नागरिकांवर पडणार आहे. सध्याची जिल्ह्याची आकडेवारी पाहता १० लाख महिलांना एका महिन्याचे १५०० रुपये याप्रमाणे १५० कोटी ९४ लाख ६६ हजार ५०० रुपये तर तीन महिन्यांचे ४५२ कोटी ८३ लाख ९९ हजार ५०० रुपये द्यावे लागले आहेत. राज्यात सत्ताबदल झाला नाही आणि ही योजना अशाच पद्धतीने कायमस्वरूपी सुरू राहिली तर वर्षाला शासनाच्या फक्त काेल्हापूर जिल्ह्यासाठी १८११ कोटी ३६ लाखांची तरतूद करावी लागेल.

पैसेवाल्या सुटल्या, गरीब अडकल्या..ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांचे बँक खाते आधारशी लिंकिंग आहे त्यांना अनुदान लगेच मिळाले, पण ज्यांचे हातावर पोट आहे, ज्या महिला कधी बँकेत गेलेल्या नाहीत, कागदपत्रांचा अभाव आहे अशाच महिलांना हे अनुदान अद्याप मिळालेले नाही. त्यांना दाद कुणाकडे मागावी, हेदेखील कळेनासे झाले आहे.

लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यातील स्थिती

  • योजनेसाठी आलेले अर्ज : १० लाख २२ हजार ४१
  • मंजूर अर्ज : १० लाख ६ हजार ३११
  • आधार सीडिंग न झालेले : ८५ हजार ८४८
टॅग्स :kolhapurकोल्हापूरladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाGovernmentसरकार