शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा

By admin | Updated: December 9, 2014 23:55 IST

सौंदर्य काळवंडले : तत्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज, पुन्हा जलपर्णीचा धोका

कोल्हापूर : शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाल्यातून मोठ्या प्रमाणात मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे रंकाळ्याचा जीव पुन्हा एकदा गुदमरू लागला आहे. पाण्यावर हिवरट काळसर रंगाचा तवंग साचू लागल्याने रंकाळ्यातील जीवसृष्टीलाच धोका निर्माण होऊन तलावाला अवकळा आली आहे. याकडे गांभीर्याने पाहत वेळीच उपाययोजना न केल्यास पुन्हा रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरणही अशक्य असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.रंकाळ्यात मिसळणाऱ्या ११ ते १२ एमएलडी (दशलक्ष लिटर) मैलामिश्रीत सांडपाण्यापैकी तब्बल १० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविल्याचा मनपाचा दावा आहे. मात्र, सव्वा चार कोटी रुपये खर्चून टाकलेली ड्रेनेजलाईन पूर्ण क्षमतेने सुरूच झाली नाही. पाईपमधील अडकलेल्या खरमातीमुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी पुन्हा मिसळत आहे. सांडपाणी व हवेतील उष्णतेमुळे रंकाळ्याला पुन्हा जलपर्णीचा धोक उद्भवणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याची राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून महापालिकेला ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला; पण गेली पाच वर्षे ही योजना रखडली. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईनचे काम रखडल्याने रंकाळ्याचे दुखणे वाढतच गेले. अद्याप सरनाईक कॉलनी नाल्यातील एक ते दीड एमएलडी सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत आहे. त्यामुळे सांडपाण्यापासून पूर्णपणे सुटका झालेली नाही. दूषित पाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्यावर तेलकट तवंग साचू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेल्या रंकाळा मरणासन्न झाला आहे.(प्रतिनिधी)महानगरपालिकेचे जुजबी प्रयत्न...रंकाळ्यात मिसळणारे पाणी रोखण्यासाठी मातीची पोती भरून दूषित पाणी वेगळे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. महापालिकेने योजलेल्या या तकलादू प्रयत्नांमुळेच पाण्यावर तेलकट तवंग गोळा होऊ लागला आहे. पाण्याची दुर्गंधी सुटून जलपर्णीचा धोका वाढणार आहे. तसेच संरक्षक भिंत तीन ठिकाणी पडली आहे. पैसे व तंत्रज्ञानांचा अभाव अशा कारणांमुळे हे काम ही गेली दीड वर्षे रखडले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका रंकाळ्यास बसत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे आहेत.रंकाळ्यात साचलेला कचरा, प्रदूषणामुळे जीवसृष्टीची झालेली हानीकोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळ्याला अवकळा आली आहे. प्रदूषण, स्वच्छता, मजबुतीकरण, नैसर्गिक सौंदर्य, आदी सर्वच आघाडीवर प्रशासकीय व राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष होत आहे. परिणामी वैभवशाली रंकाळ्याच्या दुखण्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. असीम सौंदर्याचं प्रतीक असलेला संध्यामठ अखेरची घटका मोजत आहे. थेट मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावातील पाणी निळे-काळे झाले आहे. धुणी-भांड्यासह म्हशी धुण्यामुळे प्रदूषणात वाढच होत आहे. मंगळवारी दुपारी रंकाळ्याची सद्य:स्थिती दर्शविणारी ही काही छायाचित्रे.