शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

शासनाच्या दुर्लक्षामुळे राज्यातील २४७ प्राध्यापकांचे जगणं मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:25 IST

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना दि. २४ नोव्हेंबर २००१ मध्ये कायम ‌विनाअनुदान धोरण लागू झाले. मात्र, त्यापूर्वीपासून राज्यातील ५३ वरिष्ठ ...

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना दि. २४ नोव्हेंबर २००१ मध्ये कायम ‌विनाअनुदान धोरण लागू झाले. मात्र, त्यापूर्वीपासून राज्यातील ५३ वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये १४ विद्याशाखेतील ४९ विषयांवर २४७ पात्र प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यांनी वेतन अनुदानासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला असता, शासनाने त्यांना ते कायम विनाअनुदान धोरणात असल्याचे सांगितले. त्यावर हे धोरण २००१ मध्ये लागू झाले असून आम्ही त्यापूर्वीपासून कार्यरत आहोत. या धोरणात वरिष्ठ महाविद्यालयांचा उल्लेख नाही. त्यामुळे आमच्यासाठी हे धोरण लागू होत नसल्याचे या प्राध्यापकांनी कागदपत्रांच्या माध्यमातून वेळोवेळी राज्य सरकार समोर मांडले. त्यानंतर हे प्राध्यापक कायम विनाअनुदान धोरणात नसल्याचे शासनाने मान्य केले. तत्कालीन उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे, विनोद तावडे आणि सध्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीदेखील याबाबतची माहिती घेतली आहे. सन २०१४ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्राध्यापकांच्या वेतन अनुदानाच्या प्रस्तावाच्या फाईलवर तातडीने ती कॅॅबिनेटसमोर ठेवण्यात यावी, असा शेरा मारला आहे. मात्र, त्यावर गेल्या सहा वर्षांपासून शासनस्तरावरून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आज ना उद्या अनुदान मिळून वेतन सुरू होईल या आशेने गेल्या १८ वर्षांपासून हे प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यातील काहीजणांचे निवृत्तीचे वय झाले आहे. महाविद्यालयाची वेळ संपल्यानंतर रिक्षा चालविणे, हॉटेलमध्ये काम आदी पर्यायी रोजगार करून हे प्राध्यापक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

चौकट

रिक्त जागांवर समायोजन करून प्रश्न सोडवा

राज्यात विविध अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या १४ हजार जागा रिक्त आहेत. शासनाला आमच्या वेतनासाठी अनुदान देणे शक्य नसेल, तर या रिक्त जागांवर या २४७ प्राध्यापकांचे समायोजन करून त्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अन्यायग्रस्त कायम विनाअनुदान कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड यांनी केली. एक तर आम्ही कार्यरत असलेल्या महाविद्यालयांना अनुदान द्यावे. नाही तर आमचे अनुदानित महाविद्यालयांमध्ये समायोजन करावे, या मागणीसाठी लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राध्यापक काय म्हणतात?

कोरोनामुळे पर्यायी रोजगारही थांबला आहे. नातेवाईक, मित्रमंडळींकडूनही हातउसने पैसे घेणे शक्य होत नाही. त्यामुळे घरखर्च चालविणे अडचणीचे झाले. घर चालवावे की, जीव द्यावा, अशी आमची अवस्था झाली आहे.

-प्रा. सतीश ढोरे, चान्नी, अकोला.

आई, वडील, कुटुंबीयांचे पाठबळ आणि कॉलेज संपल्यानंतर पर्यायी काम करून कसाबसा उदरनिर्वाह केला. आता आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली आहे. त्याचा गांभीर्याने विचार करून शासनाने आमच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा.

-प्रा. शिवराम गायकवाड, नंदुरबार.