शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे बावड्यात गवताच्या पहिल्या कापणीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:44 IST

जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या दमदार पावसामुळे नदीकाठच्या कसदार हिरव्या गवताच्या पहिल्या कापणीस आता बावड्यात सूरूवात झाली आहे. गवत मंडईतही विक्रीसाठी गवताची आवकही होवू लागली आहे. संपूर्ण पावसाळ्यात शेतकऱ्यांना गवताच्या एकूण चार कापण्या मिळतात.

ठळक मुद्देदमदार पावसामुळे बावड्यात गवताच्या पहिल्या कापणीस सुरुवातमंडईतही विक्रीसाठी गवताची आवक

कसबा बावडा : जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या दमदार पावसामुळे नदीकाठच्या कसदार हिरव्या गवताच्या पहिल्या कापणीस आता बावड्यात सूरूवात झाली आहे. गवत मंडईतही विक्रीसाठी गवताची आवकही होवू लागली आहे. संपूर्ण पावसाळ्यात शेतकऱ्यांना गवताच्या एकूण चार कापण्या मिळतात.कसबा बावड्याच्या सभोवती नदी असल्याने नदीकाठच्या गवताच्या कुरणाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. साहाजिकच बावड्यात हिरव्या गवताचा चारा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे अनेक शेतकरी शिल्लक गवताची बावड्यात व शाहूपुरी गवत मंडईत त्याची विक्री करतात.संपूर्ण पावसाळ्यात गवताच्या चार कापण्या मिळाव्यात म्हणून शेतकरी प्रत्येक कापणीनंतर गवताला युरिया खताचा डोस देतात. बऱ्याच वेळा पूर आला की नदीकाठचे गवत पाण्यात बुडून कुजून जाते. कुजलेले गवत वास येत असल्याने जनावरे खात नाहीत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे गवताची कापणी करताना पूरस्थितीचा अंदाज घेऊन नदीकाठच्या दिशेने गवताचे कापणीला सुरुवात केली जाते. बावड्यातील अनेक शेतकरी शासकीय कार्यालयाच्या आवारातील गवताचा लिलाव आठ-दहा जणात घेतात. सध्या शासकीय कार्यालयातील आवारातील गवताच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर