शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:49 IST

विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कशिरोळ : विहिरीतील शाळकरी मुलाचा मृतदेह बाहेर काढताना टाकवडे (ता. शिरोळ) येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नांदणी (ता. शिरोळ) येथे रविवारी घडली. सुयश रविंद्र हातगिणे (वय १४, रा. नांदणी) असे शाळकरी मुलाचे तर प्रदीप उर्फ संतोष शिवाजी झुटाळ (वय ४०, रा.टाकवडे) तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली. नांदणी (ता. शिरोळ) येथे देसकती मळा येथे आर. एस. पाटील यांच्या विहिरीत सुयश हातगिणे हा जयसिंगपूरच्या मित्रांसमवेत दुपारी एकच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. पोहताना सुयश बुडाला. यावेळी विहिरीवर असणाऱ्या त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, तो पूर्ण बुडाला. ही घटना वाऱ्यासारखी नांदणी गावात पसरल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. शिरोळ पोलीसही घटनास्थळी आले. विहीर खोल असल्याने सुयशचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचण येत असल्याने टाकवडेचे संतोष झुटाळ यांना बोलाविण्यात आले. झुटाळ हे पट्टीचे पोहणारे असल्याने त्यांनी पाण्याचा अंदाज घेतला. दोन वेळच्या प्रयत्नानंतर सुयश याचा मृतदेह काढण्यात त्यांना यश आले. हा मृतदेह विहिरीच्या काठावर असणाऱ्या लोकांकडे देत असतानाच संतोष झुटाळ हे पाण्यात बुडाले. यामुळे नागरिक व पोलिसांची तारांबळ उडाली. घटनास्थळी असणारे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, संतोष मिळून आला नाही. त्यामुळे औरवाड (ता. शिरोळ) येथील वजीर रेस्क्यू फोर्स या पथकाला पाचारण केल्यानंतर दोरीला लोखंडी गळ लावून मृतदेहाची शोधाशोध केली. अखेर तिसऱ्या प्रयत्नात संतोष याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. यावेळी नातेवाइकांनी आक्रोश केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड करीत आहेत. अखेरची उडी ठरलीसुयश हातगिणे हा जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता. मित्रांसमवेत तो विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. दोनवेळा पोहून आल्यानंतर आणखीन एक उडी घेतो, असे सांगून पुन्हा त्याने विहिरीत उडी घेतली. यामध्ये त्याचा बुडून मृत्यु झाला. त्याच्या मृत्युने परिवाराला धक्का बसला. पोलीस हवालदारांचा साहसीपणादुपारी एकच्या सुमारास सुयश याचा विहिरीत बुडून मृत्यु झाल्यानंतर दुपारपर्यंत त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला नव्हता. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संतोष झुटाळ याने हा मृतदेह बाहेर काढला. पण त्याच पाण्यात तो बुडाला. संतोष बुडत असताना क्षणाचाही विलंब न लावता पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप यांनी विहिरीत उडी मारुन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. अन् संतोषवर काळाची झडपसंतोष हा विहिरीत बुडालेले मृतदेह काढण्यासाठी तरबेज होता. पोलीसमित्र म्हणूनही शिरोळ पोलिसांना घटनास्थळी विनामोबदला सेवा देत असे. कितीही खोल विहिरीत अथवा नदीत मृतदेह अडकला असेल तर शिरोळ पोलीस प्रथम संतोषला बोलावून घेत. मात्र, रविवारी संतोषवर काळाने झडप घातली अन् सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संतोषने जगातून एक्झिट घेतली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील असा परिवार आहे. अन् संतोषवर काळाची झडप.