शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊन झाल्याने रेशनवरील धान्य विक्री ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:09 IST

महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत आहे. गरीब आणि विशेषत: दुष्काळग्रस्त जनतेच्या पोटापाण्याचा मुख्य आधार असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमधून गेल्या काही दिवसांपासून रेशन विक्रीच ठप्प झाली आहे.

- प्रवीण देसाईकोल्हापूर  - महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत आहे. गरीब आणि विशेषत: दुष्काळग्रस्त जनतेच्या पोटापाण्याचा मुख्य आधार असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमधून गेल्या काही दिवसांपासून रेशन विक्रीच ठप्प झाली आहे. सर्व्हर डाऊनमुळे इ-पॉस मशीन्स बंद झाल्याने ही परिस्थिती ओढविली आहे. राज्यभरात १ कोटी ५४ लाख ९७ हजार ६११ रेशनकार्डधारक असून, त्यांना गेल्या तीन दिवसांपासून रेशनवर गहू, तांदूळ, डाळ मिळालेली नाही.इ-पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर ग्राहकांना रेशनवर धान्य मिळाल्याने गैरप्रकारांना थोडा आळा बसला आहे. सरकारच्या या निर्णयाचे रेशन दुकानदार व त्यांच्या संघटनांनीही स्वागत केले आहे; परंतु या मशीनमधील तांत्रिक दोष काढण्यात पूर्णत: यश न आल्याने सर्व्हर डाऊन झाल्यावर ही मशीन बंद पडण्याचे प्रकार अधूनमधून सर्रास घडत आहेत. यावेळी सलग तीन दिवस हा तांत्रिक बिघाड कायम राहिला असून त्याला कोणी वालीच नसल्यासारखी परिस्थिती आहे.राज्य सरकारने व्हिजन टेक, लिंकवेल व ओअ‍ॅसिस या तीन कंपन्यांकडून इ-पॉस मशीन भाड्याने घेऊन ती दुकानदारांना दिली आहेत. यासाठी जिल्हा किंवा तालुकास्तरावर तंत्रज्ञाची नियुक्ती करणे आवश्यक आहे; परंतु ती केलेली नाही.तसेच तांत्रिक माहिती देण्याकरिता प्रशासकीय अधिकारीही नेमलेला नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांतर्फे थेट राज्याच्या पुरवठा विभागाच्या सचिवांशीच संपर्क साधावा लागतो. त्यांच्याकडूनही नीट खुलासा झाला नसल्याचे सांगण्यात आले.सर्व्हर डाऊनमुळे राज्यभरातील इ-पॉस मशीन बंद असून, रेशनवरील धान्य विक्री पूर्णपणे बंद आहे. राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप न करता बघ्याची भूमिका घेत आहे. हा प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.-चंद्रकांत यादव, राज्य प्रवक्ते, रेशन बचाव समिती

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र