शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप : डॉक्टरांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 16:20 IST

कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात चार दिवस दाखल करुनही कोणत्याही प्रकारे उपचार न केल्याने रुग्ण नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडीत्रे, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असलेचा आरोप करीत त्यांचेवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव पसरला. येथील काही डॉक्टर समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना संतप्त नातेवाईकांनी त्यांना धक्काबुक्की केली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

ठळक मुद्देहलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप : डॉक्टरांना धक्काबुक्कीगुन्हा दाखल करण्याची मागणी : सीपीआर रुग्णालयातील प्रकार

कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयात चार दिवस दाखल करुनही कोणत्याही प्रकारे उपचार न केल्याने रुग्ण नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडीत्रे, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असलेचा आरोप करीत त्यांचेवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव पसरला. येथील काही डॉक्टर समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना संतप्त नातेवाईकांनी त्यांना धक्काबुक्की केली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.दरम्यान सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे हे शासकीय कामानिमित्त मुंबईला गेले होते. रुग्णाचे नातेवाईक आणि पीपल्स पिरपिब्लक पार्टीचे जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर यांनी त्यांचेशी फोनवर संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. ते मुंबईहून कोल्हापूरला येण्यासाठी निघाले आहेत. त्यांची भेट घेवून पुढील कार्यवाही झालेनंतरचं मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे भास्कर यांनी सांगितले. सायंकाळी उशीरापर्यंत मृतदेह शवगृहात ठेवून होता.

नामदेव भास्कर यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. पुन्हा त्यांच्या पायाला गाठ उठल्याने त्यांना १६ मे रोजी रात्री सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गेली चार दिवस त्यांच्या पोटात अन्न नव्हते. डॉक्टरांनी सलाईनही लावली नाही. फक्त औषधे दिल्याने त्यांची प्रकृत्ती अत्यावस्थ झाली. याठिकाणी चार ते पाच डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यासाठी येत असतात.

चार दिवस डॉक्टरांनी त्यांचेकडे दूर्लक्षच केल्याने मंगळवारी सकाळी नामदेव भास्कर यांचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती समजताच सीपीआरमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली. डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याने रुग्ण दगावलेचा आरोप करीत गोंधळ घातला. येथील डॉक्टर गिरीष कांबळे, डॉ. बरगे, डॉ. मेंचू, डॉ. घोरपडे यांनी नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता संतप्त नागरिकांनी शिव्यांची लाखोली वाहत त्यांना धक्काबुक्की केली.

वादावादी वाढल्याने खासगी सुरक्षारक्षकांनी धाव घेत जमावाला पांगवले. सीपीआरच्या शवगृहात मृतदेह ठेवला होता. अधिष्ठाता डॉ. लोकरे यांची भेट घेवूनचं मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे डी. जी. भास्कर यांनी सांगितले. मृत नामदेव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.नेत्रदानाचा निर्णयनामदेव भास्कर यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात डॉक्टरांवर आरोप केल्याने वातावरण तापले होते. दूपारी बाराच्या सुमारास नातेवाईकांनी मृत नामदेव यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेत्रदान केले. 

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी