शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्र्यांच्या तारखेअभावीतीन कोटींची दिव्यांगांची साधने पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:38 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत सुमारे तीन कोटी रुपयांची दिव्यांगांची साधने जूनमध्येच आली असून, केवळ केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची तारीख मिळत नसल्याने या साधनांचे वितरण थांबले आहे. एकीकडे दिव्यांगांना या साधनांची गरज असताना मंत्र्यांना वेळ नसेल तर जिल्हा परिषदेच्या पातळीवर तातडीने ही साधने वितरित करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यांच्या तारखेअभावीतीन कोटींची दिव्यांगांची साधने पडूनलाभार्थाी प्रतीक्षेत, राजकीय पाठपुराव्याची गरज

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत सुमारे तीन कोटी रुपयांची दिव्यांगांची साधने जूनमध्येच आली असून, केवळ केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची तारीख मिळत नसल्याने या साधनांचे वितरण थांबले आहे. एकीकडे दिव्यांगांना या साधनांची गरज असताना मंत्र्यांना वेळ नसेल तर जिल्हा परिषदेच्या पातळीवर तातडीने ही साधने वितरित करण्याची गरज आहे.गेल्या वर्षी शाहूजयंतीचे औचित्य साधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला आॅनलाईन नोंदणी, दुसऱ्या टप्प्यात दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आले. ज्या दिव्यांगांना साधनांची गरज आहे, अशांसाठी बाराही तालुक्यांत तपासणी शिबिरे घेण्यात आली.

यानंतर संबंधितांना आवश्यक असणाऱ्या साधनांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५६९५ दिव्यांगांना नऊ कोटी १३ लाख रुपयांचे साहित्य तयार करण्यासाठी अ‍ॅल्मको कंपनीशी पत्रव्यवहारही झाला. यानंतर संबंधितांची मापे घेऊन ही साधने तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले.दरम्यान, ६ जुलै रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या दृष्टीने प्राथमिक तयारीही सुरू झाली; परंतु नंतर हा कार्यक्रम रद्द झाला. परंतु मंत्र्यांचा कार्यक्रम ठरल्याने तातडीने कंपनीने ३० टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे तीन कोटी रुपयांची साधने कोल्हापूरला पाठवून दिली.ही साधने सुरुवातीला राजाराम तलावाजवळील महसूल विभागाच्या गोदामांमध्ये उतरण्यात आली. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन्स आल्याने येथील साधने जिल्ह्यातील पाच तालुक्यांना पाठवून देण्यात आली.

यानंतर महापूर आणि विधानसभा निवडणुका लागल्याने हा विषयच पुढे आला नाही; परंतु एक तर केंद्रीय मंत्र्यांनी तातडीने तारीख देऊन हा कार्यक्रम घेण्याची गरज होती किंवा ते न येता या साधनांचे वितरण दिव्यांगाना होण्याची गरज होती. किमान आता तरी याबाबत त्वरित निर्णय होण्याची गरज आहे.राजकीय इच्छाशक्तीचा अभावएकीकडे गावात शासनाच्या योजनेतून ५० हजार रुपयांचे साहित्य देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली जाते. कार्यक्रम घेतले जातात; परंतु येथे नऊ कोटींपैकी तीन कोटींचे साहित्य येऊन पाच महिने होत आले तरी ते दिव्यांगांना वाटले गेलेले नाही. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी किंवा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रबळ राजकीय इच्छाशक्ती न दाखविल्याने याबाबत तातडीने निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येते.

या साधनांच्या वितरणाचे महत्त्व उच्चपदस्थांनी वेळीच राज्यातील मंत्र्यांच्या माध्यमातून सांगितले असते तर कदाचित याआधीच हे वितरण झाले असते, असे भाजपच्याच एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यामुळेच आम्ही बाद झालोय, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.या साहित्याचे होणार वितरणव्हीलचेअर (लहान, मोठी), ट्रायसिकल (लहान, मोठी), कुबड्या, एल्बो क्रचेस, रोलेटर (लहान, मोठे), कॅलिपर, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, एम. आर. किट, स्मार्ट केन, डायसी प्लेअर, कुष्ठरोग किट. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर